एकाच कुटुंबातील तिघांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:25 PM2018-09-19T22:25:19+5:302018-09-19T22:25:38+5:30
राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे शहरातील एकाच कुटुंबातील तिघे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण बख्तर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे शहरातील एकाच कुटुंबातील तिघे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण बख्तर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.
शारदानगरातील सदर रुग्ण असून, यामध्ये ७० वर्षांची वृद्धा, ५० वर्षांचा तिचा मुलगा आणि अठ्ठावीस वर्षीय नातीला स्वाइन फ्लू झाला आहे. या तिघांची एच-वन एन-वन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. हा जीवघेणा आजार अमरावतीत पुन्हा डोके वर काढले आहे. यापूर्वी आॅगस्ट महिन्यात याच डॉक्टरांकडे एक रुग्ण आढळून आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा घेतला. याठिकाणी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लूचे रुग्ण असल्याची माहिती आहे का, अशी विचारणा केली. मात्र, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला स्वाईन फ्लूची कल्पनाच नसल्याने पालकमंत्री प्रचंड चिडले. त्यांनीच डॉ. विजय बख्तार यांच्याकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण असल्याचे सांगितले.