ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत तीन फायर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:12+5:302021-08-12T04:17:12+5:30
परतवाडा : अकोला वन्यजीव विभागांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वनकर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला हवेत तीन ...
परतवाडा : अकोला वन्यजीव विभागांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वनकर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला हवेत तीन फायर करावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढ्या चारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मेंढ्यांमुळे अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या अवैध मेंढ्या चराईला अंकुश लावण्याकरिता १० ऑगस्टला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांचा ताफा ज्ञानगंगा अभयारण्यात गस्तीवर असताना त्यांना हे मेंढपाळ दिसले. त्यांनी हटकले तेव्हा ते वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आलेत. पस्तीस ते चाळीस जणांचा हा समूह होता. यांच्यापासून वन कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याकरिता अखेरचा उपाय म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीन फायर केले. त्यामुळे तो समूह घटनास्थळावरून पळून गेला आणि वनकर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.
कोट
ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध मेंढी चराईचे प्रमाण अधिक आहे. ही मंडळी स्थानिक वनकर्मचाऱ्यांचेही ऐकत नाहीत. वनकर्मचाऱ्यांनी त्यांना हटकल्यास ते वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. १० ऑगस्टला गस्तीवर असताना हे मेंढपाळ अभयारण्यात दिसले. त्यांना हटकण्याचा गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. पण, ते अंगावर धावून गेल्याने वनकर्मचाऱ्यांना वाचविण्याकरिता हवेत तीन फायर करावे लागले. फायरनंतर ते मेंढपाळ घटनास्थळावरून पळून गेले.
- दीपेश लोखंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी