बगाजी सागरचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:59+5:302021-07-23T04:09:59+5:30

फोटो - धामणगाव रेल्वे : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणात जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात ...

The three gates of the Bagaji Sea opened | बगाजी सागरचे तीन दरवाजे उघडले

बगाजी सागरचे तीन दरवाजे उघडले

Next

फोटो -

धामणगाव रेल्वे : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणात जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. वर्धा नदीला पूर आला असून पुढील दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. २८२.६९० मीटर म्हणजे ६९.७७ टक्के जलसाठा या धरणात आहे. त्यामुळे बगाजी सागर धरणाचे तीन दरवाजे पाच सेमीपर्यंत उघडून १३.४० क्यूसेक प्रतिसेकंद नुसार पाण्याचा विसर्ग सायंकाळी ६ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे.

वर्धा नदीकाठावरील वरूड बगाजी, चिंचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर, नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, सोनोरा काकडे, आष्टा, झाडा, चिंचोली, विटाळा या गावांतील गावकरी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नदीकाठावरील शेतकरी, घरमालक, मासेमार यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे व मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले आहे.

Web Title: The three gates of the Bagaji Sea opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.