बेलोरा येथे वीज कोसळून तीन बकऱ्या ठार (पावसाच्या बातमीतील बॉक्स)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:59+5:302021-02-20T04:34:59+5:30
शेंदुरजनाघाट परिसरात गारपीट शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट व परिसरात गुरुवार दुपारी ३ वाजता गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे गहू, ...
शेंदुरजनाघाट परिसरात गारपीट
शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट व परिसरात गुरुवार दुपारी ३ वाजता गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे गहू, चणा, एरंडी या पिकांसह संत्रापिकाचे प्रचंड नुकसान झाले. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. १६ फेब्रुवारीपासून शेंदूरजनाघाट परिसरातील वातावरणात गारवा आहे. गुरुवार दुपारी ३ वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासोबतच गारही आली आहे. बोराएवढी गार आली. यामुळे गहू, चना, एरंडी या पिकाचे नुकसान झाले.
----------------------------
अचलपूर तालुक्यात सर्वत्र पाऊस
परतवाडा : अचलपूर तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर सर्वत्र पाऊस पडला. यात काही ठिकाणी जोराचा तर, काही ठिकाणीकमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. तालुक्यातील काही भागातील चना व गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले. दरम्यान तालुक्यात कुठेही गारपीट झाल्याचे वृत्त नाही. चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम येथे दुपारी २.३० ते ४ च्या दरम्यान, विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस पडला.
-------------------------------