रेल्वेला दरदिवशी तीन तासांचा मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:27 AM2019-07-22T01:27:15+5:302019-07-22T01:28:09+5:30
बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस ही गाडी क्रॉस होताच रेल्वे ट्रॅक दुरूस्तीच्या कामांना प्रारंभ केला जातो. महिनाभरापासून बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीचे कामे सुरू आहे. पावसाळ्यात अपघाताच्या घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ट्रॅक मेंटनन्सची कामे सुरू केली आहेत. ट्रॅक दुरूस्तीकरिता अद्ययावत पाच मशीन मागविण्यात आल्या आहेत. ट्रॅक दुरूस्तीची कामे संपताच पुलांची डागडुजी, दुरूस्ती होणार आहे. सायंकाळच्या वेळेत भुसावळहून बडनेराकडे येणाºया गाड्यांना उशिराचा फटका बसत आहे. नियमित गाड्याही तास, दीड तास विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. पावसाळ्यात रेल्वे रूळाची दुरूस्ती केली नाही तर अपघाताच्या घटना घडतात, असा रेल्वे प्रशासनाला यापूर्वीचा अनुभव आहे.
पावसाळ्यानंतर चार पुलांची होणार दुरुस्ती
बडनेरा ते कुरूम दरम्यान रेल्वे ट्रॅक दुरूस्तीची कामे झाल्यानंतर चार पुलांच्या दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. कुरूम ते अकोला दरम्यान रेल्वे पुलांची कामे पूर्णत्वास आल्याची माहिती रेल्वे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे. पावसाळ्यात रेल्वे पुलांचे बांधकाम करणे अवघड जात असून, पावसाळ्यानंतर ती केली जाणार आहे.
ट्रॅक मेटेनन्सची कामे दोन महिने चालणार आहे. गिताजंली एक्स्प्रेस गेल्यानंतर ही कामे सुरू होतात. काहीच गाड्यांना विलंबाने धावत आहेत. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान ही कामे केली जातात.
- पी. के. सिन्हा,
प्रबंधक, बडनेरा रेल्वे