तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडले

By admin | Published: May 16, 2017 12:07 AM2017-05-16T00:07:39+5:302017-05-16T00:07:39+5:30

तितर, बटेर विकताना तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानकावर उघडकीस आली.

Three hunters caught in a tinkle | तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडले

तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडले

Next

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी : वडाळी वनपरिक्षेत्राची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तितर, बटेर विकताना तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी वन्यप्राणी, वन्यपशू संवर्धन कायद्यातर्गंत ३ शिकाऱ्यांविरुद्ध वनगुन्हे नोंदविले.
नरन निवृत्ती पवार (रा. मंगरूळ चव्हाळा), श्रीलाल हरिलाल भोसले (रा. ओंकारखेडा), श्रीराम अभिमान रावेकर (नांदगाव खंडेश्वर) असे अटकेतील तीन आरोपींचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार वडाळी वनपरिक्षेत्र विभागांतर्गत बडनेरा वन बीटच्या नांदगाव खंडेश्वर बसस्थानकावर वन्यप्राणी व वन्यपशूंची विक्री होत असल्याची माहिती उपवनसंरक्षकांनी संबंधित वनाधिकाऱ्यांना दिली. त्या आधारे बडनेरा वनपाल वर्षा हरणे यांनी सहकारी वनरक्षकांच्या मदतीने शिकाऱ्यांना पकडले. तिघांकडून जिवंत ७ तितर, सात बटेर आणि दोन ससे ताब्यात घेतले. आरोपींना अटक करून त्यांचाविरुद्ध वनगुन्हे नोंदविले. आरोपींना सोमवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक हमंत मीणा यांच्या आदेशाात आली. वडाळीचे वन परिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना अटक करण्यात आली. वनपाल वर्षा हरणे यांच्यासह वनरक्षक एस.एस. खराबे, एस. एम. काळबांडे, कोहळे,वनमजूर सुभाष गवई, पठाण आदींनी यशस्वी कारवाई केली.

Web Title: Three hunters caught in a tinkle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.