पिकअप वाहन-कार अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:27+5:302021-06-18T04:10:27+5:30

अमरावती : भरधाव पिकअप वाहन आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह तिघे जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, ...

Three injured in pickup vehicle-car accident | पिकअप वाहन-कार अपघातात तिघे जखमी

पिकअप वाहन-कार अपघातात तिघे जखमी

googlenewsNext

अमरावती : भरधाव पिकअप वाहन आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह तिघे जखमी झाले.

पोलीस सूत्रांनुसार, यश बोरखडे (२२, रा. गाडगेनगर), त्याचा एक मित्र आणि पिकअप वाहनचालक सूरज कानपुरिया (२९, रा. पुलगाव) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. पोहरा मार्गावरील वाघामाता मंदिरजवळील मार्गावर अमरावतीवरून चांदूर रेल्वेकडे जाणारी पीकअप वाहन व कार समोरासमोर धडकले. या अपघातानंतर पिकअप वाहनासह कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन उलटली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला. यश बोरखडे व त्याचा एक मित्र हे कार (एमएच १२ पीझेड २०४७) ने पोहऱ्यावरून अमरावतीकडे येत होते.

Web Title: Three injured in pickup vehicle-car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.