तीन लाख नागरिक करतात उघड्यावर लघुशंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:14 PM2019-02-04T23:14:10+5:302019-02-04T23:14:37+5:30

शहरातील बाजारपेठेत मूत्रिघरांची संख्या अपुरी असल्याने दररोज तीन लाख नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. आधीच नाल्या तुंबल्याने डासांचा व त्यात या दुर्गंधीचा सामना करभरणा करणाऱ्या अमरावतीकरांना सहन करावा लागत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनवरून निदर्शनास आले.

Three lakh citizens are exposed to small children | तीन लाख नागरिक करतात उघड्यावर लघुशंका

तीन लाख नागरिक करतात उघड्यावर लघुशंका

Next
ठळक मुद्देस्वच्छतेचा बोजवारा : अमरावती शहरातील बाजारपेठेत पसरले घाणीचे साम्राज्य

मनीष कहाते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील बाजारपेठेत मूत्रिघरांची संख्या अपुरी असल्याने दररोज तीन लाख नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. आधीच नाल्या तुंबल्याने डासांचा व त्यात या दुर्गंधीचा सामना करभरणा करणाऱ्या अमरावतीकरांना सहन करावा लागत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनवरून निदर्शनास आले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली राजकमल चौकातील शेकडो व्यापारी प्रतिष्ठानांना प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याने अंबापेठ स्थित खापर्डे वाड्याच्या मागील गल्लीत विद्युत रोहीत्र असलेल्या ठिकाणी रोज दोन हजारांवर नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. या परिसरात हॉटेल, कॅन्टीनसह विविध दुकाने, खासगी दवाखाने आहेत. ग्राहकांसह रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा असून, नागरिकांचीदेखील विविध कामांनिमित्त वर्दळ राहते. या रस्त्यात प्रसाधनगृह शोधायचे, तर कुठेच दिसत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव उघड्यावरच हा विधी आटोपला जातो. त्यातही बाहेरगावचे नागरिक मोठ्या प्रमाणात या चौकातून ये-जा करीत असल्याने नियमित गर्दी येथे दिसून येते. अशी शहरातील विविध ठिकाणी आहेत, जेथे उघड्यावर लघुशंका केली जाते. तहसील कार्यालयासमोरील चर्मकारांना देण्यात आलेल्या दुकानांलगत लघुशंकेसह रात्रीचा अंधार व वर्दळ नसल्याचा फायदा घेत शौचसुद्धा केली जाते. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खचदेखील तेथे आढळून येतो. या विषयात महापालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, जेणेकरून शहराच्या स्वच्छतेला लागत असलेले गालबोट दूर होईल, अशी प्रतिक्रिया त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली.
महिलांची कुचंबणा
अमरावती हे विभागाचे मुख्यालय असलेले शहर आहे. यामुळे विविध कामांनिमित्त पाचही जिल्ह्यांतील नागरिक येथे ये-जा करतात. शहरातील साडेआठ लाख नागरिकांपैकी तीन लाखांचा संबंध दररोज व्यापारी पेठेशी येतो. यात काही सुविधायुक्त ठिकाणी, तर काही उघड्यावर लघुशंका करीत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, महिलांसाठी सुविधा नाहीत. त्यांची मोठी कुचंबणा होत असल्याने त्याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रियादेखील उमटली.

आॅटोगल्लीत उघड्यावर दररोज दोन हजार नागरिक लघुशंका करतात. त्याचा लगतच्या प्रतिष्ठानांना त्रास सहन करावा लागतो. या भागात प्रसाधनगृहाची व्यवस्था व्हायला हवी.
- पंकज राठोड
नागरिक, अंबापेठ

नगर वाचनालयाच्या मागील संरक्षणभिंतीलगत नालीवर मोठ्या प्रमाणावर नागरिक लघुशंका करतात. हटकल्यास भांडायला येतात. येथील व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे.
- पंकज सरोदे
नागरिक, श्याम चौक

तहसीलमध्ये कामानिमित्त येणाºया नागरिकांना लघुशंकासाठी इतरत्र जागाच नसल्याने चर्मकारांच्या दुकानांमागील नालीत बहुतांश नागरिक लघुशंका करतात. यावर उपयायजना हवी.
- श्यामलाल वर्जे
चर्मकार

उघड्यावरील लघुशंकेचा प्रकार थांबविण्यासाठी आतापर्यंत २० जणांना दंड ठोठावला. अशा भागांत वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाही दिल्यात. आता आकस्मिक भेट देऊन कारवाई करू.
- सिद्धार्थ गेडाम
स्वास्थ्य निरीक्षक, महापालिका

Web Title: Three lakh citizens are exposed to small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.