परतवाड्यात तीन लाखांचे अवैध सागवान पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:24+5:30
लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर अवजारेही वनविभागाने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ कलम २६ (१), ४१, ४२, महाराष्ट्र वननियमावली नियम ३१,४७ अन्वये वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक एन.ए. फर्निचर मार्टमधून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तीन लाखांचे अवैध सागवान पकडले. मालवाहू वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे.
पंचमुखी मंदिरापुढील तारानगर परिसरातून ११ ऑगस्टला सकाळी हे अवैध सागवान जप्त केले गेले. चालक सुमीत वाडवे व फर्निचर मार्टचा संचालक राजा खान महमूद खान यांना ताब्यात घेण्यात आले. एमएच २७ एक्स १३९३ या चारचाकी वाहनामध्ये अवैध सागवान लाकूड एन.ए. फर्निचर मार्ट येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाल्यावरुन ही धाड टाकली गेली. या लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर अवजारेही वनविभागाने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ कलम २६ (१), ४१, ४२, महाराष्ट्र वननियमावली नियम ३१,४७ अन्वये वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल डी.सी. लोखंडे, ए.एन. ठाकरे, के.डी. काळे, वनरक्षक नितीन अहिरराव, प्रवीण निर्मळ, प्रशांत उमक, राजेश गायकी, पी.के. वाटाणे, रूपाली येवले, शिवम बछले, जगन पालीयाड, व्ही.जे. तायडे, अमोल निमकर, पूजा वानखडे, प्रवीणा निमकर, वाहनचालक सूरज भांबूरकर, पोलीस कॉन्स्टेबल ए.आर. धर्माळे यांनी ही कारवाई पूर्णत्वास नेली.