देशीकट्ट्यासह तीन जिवंत काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:07+5:302021-04-01T04:14:07+5:30
शहर गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा नोंदविला (फोटो आहे. ) अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आर्म ॲक्टसह सहकलम १३५ महाराष्ट्र ...
शहर गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा नोंदविला (फोटो आहे. )
अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आर्म ॲक्टसह सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार दाखल एका गुन्ह्यातील आरोपी आकीब हुसैन अख्तर हुसेन (२३ रा. अलमासनगर, जुनीवस्ती, बडनेरा) कडून एक देशी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस असा एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
३० मार्च रोजी पोलिसांनी बडनेरा शहरात सापळा रचून ही कारवाई केली आहे. यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी सैय्यद वसिम सैय्यद नूर (२६ रा. फरीदनगर, अमरावती) याच्या ताब्यातून एक देशी बनावटी कट्टा, १२ जिवंत काडतूस, आरोपी शेख समिर मौलाना शेख अफसर (२५), मोहम्मद अवेस मोहम्मद लतीफ (२१ दोन्ही रा. गौसनगर) यांच्या ताब्यातून तीन देशी कट्टे व आठ जिवंत काडतूस तसेच आरोपी मोहम्मद असीम ऊर्फ लड्डु मोहम्मद इद्रीस (३० रा. पॅराडाईस कॉलनी) यांच्या ताब्यातून एक बनावटी कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
बॉक्स
दोन आठवड्यात सहा कट्टे, २६ जिवंत काडतूस जप्त
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आठवड्यांत आरोपींकडून सहा देशी कट्टे (२ लाख ७ हजार) आणि २६ जिवंत काडतूस (२६ हजार) आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन (७० हजार) असा एकूण ३ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुण अग्निशस्त्र बाळगत असल्याचे दिसून येत आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व त्यांच्या पथकाने केली. शहरात देशी कट्टा व जिवंत काडतूस मिळून येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.