बाजार समितीत तीन पॅनेल निवडणुकीच्या मैदानात
By admin | Published: September 2, 2015 12:09 AM2015-09-02T00:09:22+5:302015-09-02T00:09:22+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याने १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे.
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याने १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. बाजार समितीत तीन पॅनल निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती म्हणून अमरावती बाजार समिती ओळखली जाते.यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ११ जागांसाठी सर्वसाधारण मतदार संघात ७, महिला मतदार संघात २, इतर मागासवर्ग मतदार संघात १, विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघात १ जागेसाठी या प्रमाणे मतदार संघातून उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात एकूण ४ जागांसाठी सर्वसाधारण मतदार संघातून २, अनुसूचित जाती - जमाती मतदार संघातून १, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून १ आणि व्यापारी व अडते मतदार संघातून २ व हमाल तोलारी मतदार संघातून १ अशा प्रकारे १८ संचालक बाजार समितीवर निवडून द्यायचे आहेत. १८ जागांसाठी ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ७३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळी ही निवडणूक चुरसीची होणार आहे. अशातच सुरूवातील केवळ दोन पॅनेल राहतील, असे चित्र होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन पॅनेल रिंगणात आहेत.
सहकार क्षेत्रात महत्वपुर्ण संस्था म्हणून बाजार समितीच्या निवडणुक ीकडे पाहले जाते. सहकारात प्राबल्य असलेल्या नेत्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असल्याने तीनही पॅनेल निवडणुकीत ताकदीने उतरले आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)