दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:53+5:30

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे.

Three people die every day in 3 accidents | दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात २९ ब्लॅक स्पॉट । वर्षभरात जिल्ह्यात १११६ अपघात

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १११६ रस्ते अपघातांमध्ये ३३४ बळी गेले आहेत. महिन्याकाठी सरासरी ९३ अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाल्याचे विदारक वास्तव पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत समोर आले. जिल्ह्यात अपघातप्रवण असे २९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे. वर्षभरात शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ३४९ अपघातांमध्ये ९२ जणांचा बळी गेला. यामध्ये ८५ पुरुष व सात महिला आहेत. शहरात एकूण २३ ब्लॅक स्पॉट आहेत.
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक ७६७ अपघातांमध्ये २४२ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये १८४ पुरुष व ५८ महिलांचा समावेश आहे. वर्षभरात ११०० पेक्षा जास्त अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. यामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, अजाणत्या वयात वाहन हाताळणे, मद्यपान करून वाहने चालविणे, निर्धारित मर्यादेपेक्षा जादा वेगाने वाहन चालविणे, इतर वाहनांना ओव्हरटेक, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण, सीट बेल्ट न लावणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे, भरस्त्यात वाहनांची पार्किंग करणे, अपघात टाळण्यारीता पुरेशा उपाययोजना नसणे, रात्री धोकादायक प्रवास आदींचा समावेश आहे.

रस्त्यावरील खड्डे जीवघेणे
जिल्ह्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांच्या हृदयाचे ठोके चुकवितात. हे खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीस्वारांचे बहुतांश अपघात होतात. योग्य दिशादर्शक फलक न लावणे, रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदराकडून खरबदारी न घेणे हीदेखील अपघाताची कारणे आहेत. अपघातात कुटुंबप्रमुख दगावल्यानंतर कुटुंबीयांची वाताहत होते. यामुळे प्रशासनाने जशा उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन कोरे यांनी केले.

माझ्याकडे वाहतूक विभागाचा चार्ज असताना नोटिफिकेशन काढून शहरात आवश्यक त्या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. शहरात जड वाहनांना फक्त दुपारी २ ते ४ यावेळीतच परवानी दिली जाते. त्याची खबरदारी आम्ही घेतो. नागरिकांनीही वाहतूक नियंमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.
- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त, अमरावती

अपघाताच्या तीव्रतेवर ठरतात ‘ब्लॅक स्पॉट’
जिल्ह्यात २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) आहेत. अमरावती शहर पोलीस हद्दीत २३, तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सहा ब्लॅक स्पॉट आहेत. तीन वर्षांत ५०० मीटरच्या हद्दीत जर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यासंदर्भातील उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

नागरिक जखमी
रस्ते अपघातात पोलीस अमरावती शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात किरकोळ व गंभीर अपघातांमध्ये जखमींची संख्यादेखील मोठी आहे. एकूण ९३६ नागरिक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. शहरात ९६ गंभीर अपघातांत १५३ जण जखमी आणि १६५ किरकोळ अपघातांत २४१ जण जखमी झाले. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गंभीर व किरकोळ अपघातात ५४२ जण जखमी झाले.

लिहून पाठवा तुमची मते !
किड्या-मुंग्यांसारखी माणसे दगावतात, तेव्हा त्यामागे कुणाचा तरी दोष असतोच. बरेचदा ‘तांत्रिक’ बाबींवर हा दोष लोटून व्यवस्था हात झटकते. अपघातातानंतर अनेक कळवळणारे प्रश्न उरतातच. कधी विधवा पत्नीच्या रुपात, कधी इवल्या-इवल्या लेकरांच्या वेदनांमध्ये. तर कधी वृद्ध आईबाबांच्या उसाश्यांमध्ये. हे अपघात कसे थांबवता येतील? करुया ‘खुली चर्चा. पत्ता : लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, शिवाजीनगर, मोर्शी रोड, अमरावती.

Web Title: Three people die every day in 3 accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात