‘भाई का बड्डे’वर डान्स; हवेत फिरविल्या तलवारी, तिघांना रात्र कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 12:36 PM2022-04-04T12:36:36+5:302022-04-04T12:40:23+5:30

पोलिसांचा सुगावा लागताच बर्थडे बॉय सै. आदिल हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. तर ते तिघे ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या डीजे साँगवर हवेत तलवारी फिरवून डान्स करताना आढळून आले.

three people get police custody for celebrating birthday on road with swords | ‘भाई का बड्डे’वर डान्स; हवेत फिरविल्या तलवारी, तिघांना रात्र कोठडी

‘भाई का बड्डे’वर डान्स; हवेत फिरविल्या तलवारी, तिघांना रात्र कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बर्थ डे बॉय’ फरार, विलासनगरातील घटना

अमरावती : वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत हवेत तलवारी फिरविणाऱ्या तिघांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली. मात्र, ‘बर्थ डे बॉय’ फरार होण्यात यशस्वी झाला.

विलासनगर गल्ली क्रमांक ४ येथे १ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. विलासनगर गल्ली नंबर ४ मध्ये काही तरुण हातात तलवारी घेऊन बर्थ डे साजरा करीत असल्याच्या माहितीवरून पोहेकाॅ इशय खांडे हे सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. तेथे राज खान, मो. रेहान व कुलदीप हे तिघे तीन तलवारी हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करताना आढळून आले.

पोलिसांचा सुगावा लागताच बर्थडे बॉय सै. आदिल हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. ते ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या डीजे साँगवर हवेत तलवारी फिरवून डान्स करताना आढळून आले. सै. आदिल या बर्थडे बॉयला विलासनगर गल्ली क्रमांक ४ मध्ये बोलावून कुलदीप भुसाटेने बर्थ डे सेलिब्रेट करण्याचा प्लॅन आखला होता. त्यांनी डीजेच्या तालावर नाचून बर्थ डे साजरादेखील केला. मात्र, त्यानंतर त्यांना गाडगेनगर पोलीस ठाण्यात रात्र काढावी लागली. याप्रकरणी २ एप्रिल रोजी पहाटे १.५४ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी राज खान ऊर्फ मो. अयुबी खान अयूब खान (१९), मो. रेहान मो. नईम (१९, दोघेही रा. गवळीपुरा मशीदजवळ, अमरावती), कुलदीप नेमीचंद भुसाटे (२१, रा. विलासनगर) व बर्थडे बॉय सैयद आदिल सै. अकील (२०, रा. गवळीपुरा) यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या ४, २५ व मपोकाच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला. बर्थडे बॉयव्यतिरिक्त तिघांनाही लागलीच अटक करण्यात आली.

‘बर्थडे बॉय’चा शोध

घटनास्थळाहून फरार झालेल्या सैयद आदिलचा शनिवारी रात्रीच शोध घेण्यात आला. गाडगेनगरचे पोलीस पथक गवळीपुऱ्यात त्याच्या घरीदेखील जाऊन आले. मात्र, तो मिळून आला नाही. तो मोबाइल बंद करून पसार झाला. त्यामुळे त्याचे लोकेशन मिळाले नसल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. अंमलदार इशय खांडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: three people get police custody for celebrating birthday on road with swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.