Amravati Jail : अमरावतीत ‘जेलब्रेक’; कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून तीन कैद्यांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 12:38 PM2022-06-28T12:38:51+5:302022-06-28T13:02:02+5:30
पहाटे २ च्या सुमारास अन्य काही कैद्यांच्या देखत त्यांनी ‘जेलब्रेक’ केल्याचे सांगितले गेले.
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात थरारक घटना घडली. या कारागृहाची पोलादी सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैद्यांनी पलायन केले. २८ जून रोजी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंतदेखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला. साहिल अजमत कालसेकर (३३, नायसी, चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (३५) व रोशन गंगाराम उईके (२३, दोघेही रा. शेंदुरजनाघाट) अशी पसार कैद्यांची नावे आहेत. यातील कळसेकर हा कलम ३०७ अन्वये दाखल प्रकरणात शिक्षा भोगत होता. तर, सुमित धुर्वे व रोशन उईके यांना पोस्को व बलात्कार प्रकरणात दोषी मानण्यात आले होते.
पहाटे २ च्या सुमारास अन्य काही कैद्यांच्या देखत त्यांनी ‘जेलब्रेक’ केल्याचे सांगितले गेले. दोन ते तीन महिन्यांपुर्वी एक कैदी कारागृहातून पसार झाला होता. मात्र, तो बॅरेकमध्ये नव्हता. त्याला लागलीच पकडण्यात देखील आले. मात्र, मंगळवारी घडलेल्या घटनेत बॅरेकसह कारागृहाची भिंत देखील ओलांडण्यात आली.