शस्त्रक्रियेनंतर तीन अजगरांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:12 AM2017-10-12T00:12:59+5:302017-10-12T00:13:26+5:30
साप म्हणताच भल्याभल्यांच्या काळजाला धसका बसतो. मात्र, साप हा मनुष्याचा शत्रू नसून मित्र असल्याची प्रचिती देत येथील वसा संस्थेने एक नव्हे, तर चक्क तीन जखमी अजगरांना शस्त्रक्रियेनंतर जीवदान देण्याची किमया केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साप म्हणताच भल्याभल्यांच्या काळजाला धसका बसतो. मात्र, साप हा मनुष्याचा शत्रू नसून मित्र असल्याची प्रचिती देत येथील वसा संस्थेने एक नव्हे, तर चक्क तीन जखमी अजगरांना शस्त्रक्रियेनंतर जीवदान देण्याची किमया केली आहे. एवढेच नव्हे, अजगरांच्या शरीरावरून ८७ हानीकारण परजिवीदेखील काढल्या आहेत.
येथील सर्पमित्र मुकेश वाघमारे यांना रहाटगावातून अपघातग्रस्त अजगराचे पिलू आढळले होते.
दुसºया घटनेत अंकुश खरड याने नांदगावपेठ नजिकच्या अंगोळा गावातून मानेजवळ दुखापत आणि शरीरावर हानीेकारक परजिवी असलेला अजगर, तर अन्य एका घटनेत सर्पमित्र ठाकूर व वानखडे यांनी दर्यापूर तालुक्यातील सामदा गावात शेतात हार्वेरस्टरने जखमी झालेल्या अजगराला वाचवून ‘वसा’कडे पाठविले होते. सापांना जीवदान देण्यासाठी कार्यरत वसा संघटनेच्या पुढाकाराने अजगरांवर पशू शल्यचिकित्सक अनिल कळमकर, शंकर मुत्युल्वार व शुभम सायंके यांनी शस्त्रक्रिया केली. सलग पाच दिवस सायपरमिथ्रीन नामक परजिवी नाशक औषधीचा वापर करुन अजगरांना जीवदान दिले आहे. शस्रक्रियेसाठी अभिषेक पुल्लजवार, ऋग्वेद तुडुंवार, शुभम झगडे, गणेश अकर्ते, भूषण सायंके, अक्षय चांबटकर आदींनी मोलाची भूमिका बजावली आहे. तीनही अजगरांवर शस्त्रक्रिया, अहवालाची माहिती ‘वसा’कडून उपवनसंरक्षक हेमंत मीणा, वडाळीचे आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांना दिली जात आहे.