परतवाड्यातून तीन चंदनाची झाडे चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:03+5:302021-05-01T04:12:03+5:30
फोटो पी ३० चंदन परतवाडा : परतवाडा - धारणी या मुख्य मार्गावर उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्यापुढील बॅप्टिस्ट चर्चमधील ४० ...
फोटो पी ३० चंदन
परतवाडा : परतवाडा - धारणी या मुख्य मार्गावर उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्यापुढील बॅप्टिस्ट चर्चमधील ४० ते ४५ वर्षे जुनी तीन चंदनाची झाडे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी तोडून त्यातील गाभा पळविण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यासंदर्भात परतवाडा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
येथील भारतीय बॅप्टिस्ट चर्चच्या आवारातील चंदनाच्या तिन्ही झाडांवर अनेक दिवसांपासून चोरांची नजर होती. गुरुवारी मध्यरात्रीनंतर तीन वाजताच्या दरम्यान चार चोरांनी ही झाडे कापली व त्यातील गाभा पळवून नेला. यासंदर्भातील अध्यक्ष शलमोन राक्षसकर यांनी परतवाडा पोलिसांत तक्रार केली आहे.
बॉक्स
चोर सीसीटीव्हीत कैद
शहरात चंदनाची मौल्यवान झाडे ज्या ठिकाणी आहेत, ते हेरून चोरटे मध्यरात्रीनंतर कापून नेत असल्याच्या घटना या अगोदरसुद्धा घडल्या आहेत. वनविभागाच्या डेपो परिसरातील उपवनसंरक्षक यांच्या बंगल्यातील झाडसुद्धा पाच वर्षांपूर्वी चोरून नेले होते. दरम्यान, चर्चच्या आवारातून तीन झाडे कापताना चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.