भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:20 AM2019-02-27T00:20:15+5:302019-02-27T00:21:32+5:30

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

Three soldiers got the war chakra in the Indo-Pak war | भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

Next
ठळक मुद्देआठवणींना उजाळा - वायुसेनेत अमरावतीची कामगिरी

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. वायुसेनेसह अन्य सर्व सैन्यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो जवान कार्यरत आहेत, तर जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरचक्राने गौरविण्यात आले होते.
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने हल्ला चढविल्याने भारतीय सेनेतील ४२ जवान शहीद झाले होते. तदनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे बारा तळ उद्ध्वस्त केले. भारत-चीन, भारत-पाकिस्तानमध्ये १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धासह कारगिल युद्धात अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.
तीन जवानांना वीरचक्र
भारत-पाकिस्तान यांच्यातील युध्दात अमरावती जिल्ह्यातील जवानांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सन १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात विंग कमांडर एस.एन. देशपांडे शहीद झाले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र देण्यात आले, तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेचे एअर कमांडर अरुणलाल देऊसकर यांना वीरचक्राने गौरविण्यात आले. सन १९४८ च्या भारत-पाक युद्धात शौर्य गाजविणारे सुभेदार पुंडलिक बकाराम बासुंदे यांना मरणोपरांत वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
युद्धमोहिमेत १७ जवान शहीद
सन १९६२ च्या भारत- चीनच्या युद्धात मराठा रेजिमेंटचे शिपाई मुरलीधर कळसाईत, सन १९७१ मधील युद्धात शंकर सांगोले, नागालँड आंतरिक सुरक्षा मोहिमेत शिपाई रामराव गेठे, श्रीलंकेतील ‘आॅपरेशन पवन’मध्ये लॉन्सनायक किशोर खांडेकर, १९९५ मधील ‘आॅपरेशन रक्षक’मध्ये ओंकार मासोदकर, १९९५ मधील आंतरिक सुरक्षा मोहीम त्रिपुरामध्ये प्रभाकर म्हसांगे, आॅपरेशन कारगिलमध्ये कृष्णा समरित, सन २००७ च्या आॅपरेशन रक्षकमध्ये लान्स दफ्तेदार प्रकाश धांडे, आसामच्या उल्फा उग्रवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायक सुनील चौहान, सन २००० मध्ये मणीलाल धांडे, १९६५ मधील भारत पाक युध्दात लान्सनायक गुलाबराव घडेकर व रावसाहेब मोहोड, अण्णासाहेब गोपाल राऊत व सुभेदार नत्थूजी खोब्रागडे व १९७१ च्या भारत पाक युद्धात विश्वनाथ वनवे असे १७ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या आॅपरेशन रक्षकमध्ये शिपाई पंजाबराव जानराव उईके शहीद झाले.

Web Title: Three soldiers got the war chakra in the Indo-Pak war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.