थ्री स्टार मानांकन, थर्ड पार्टीद्वारे पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:06 PM2019-01-02T22:06:57+5:302019-01-02T22:07:53+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने नगरसेवकांद्वारे प्रमाणीकरून करून महापालिकेच्या पदरी १२५० गुण जमा झालेत. यामुळे अभियानाचे 'थ्री स्टार रँकींग'देखील मिळाले. याची पडताळणी क्यूसीआय टिमद्वारा करण्यात येणार आहे.

Three Star Ratings, Third Party Surveillance! | थ्री स्टार मानांकन, थर्ड पार्टीद्वारे पाहणी!

थ्री स्टार मानांकन, थर्ड पार्टीद्वारे पाहणी!

Next
ठळक मुद्देओडीएफचा दावा : स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेची पाच हजार गुणांची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने नगरसेवकांद्वारे प्रमाणीकरून करून महापालिकेच्या पदरी १२५० गुण जमा झालेत. यामुळे अभियानाचे 'थ्री स्टार रँकींग'देखील मिळाले. याची पडताळणी क्यूसीआय टिमद्वारा करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी महापालिकेचा खटाटोप व नगरसेवकांद्वारा दिल्या जाणाऱ्या पत्राची सत्यता किती, हा मात्र संशोधनाचा विषय ठरत असल्याचे वास्तव आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने महानगराला यंदा पाच हजार गुणांचे सर्वेक्षण राहणार आहे. या अभियानाच्या निकषात बसण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. ही स्वागतार्थ बाब आहे. महानगर हागणदारीमुक्त दाखविण्याच्या धावपळीपेक्षा यासाठीचे प्रयत्न कसोसीने होणे महत्त्वाचे आहे. आजही काही भागातील नागरिक उघड्यावर जातात, ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. किंबहुना हागणदारीमुक्त शहर दाखविण्यासाठी नगरसेवकांजवळून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशासनाने कसोसीने प्रयत्न केलेत, ही वस्तुस्थितीदेखील नाकारता येत नाही.
या स्वच्छ सर्वेक्षणाचे गुणांकन पाच हजार गुणांचे राहणार आहे. यामध्ये सेवा स्तरावरील प्रगतीसाठी एकूण एक हजार २५० गुण राहणार आहेत. यामध्ये कचरा संकलन आणि वाहतुक, कचºयाची प्रक्रिया व विल्हेवाट, शास्वत कचरा, माहिती शिक्षण, संवाद आणि वर्तमानातील बदल, क्षमता बांधणी आणि वर्तमानातील बदल, क्षमता बांधणी आदी राहणार आहे.
महानगर हागणदारी मुक्त झाल्याची क्यूसीआय टीमद्वारा पाहणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाणे त्रयस्त पथकाद्वारा पाहणीनंतर व प्रत्यक्ष निरीक्षणाअंती एक हजार २५० गुणांच्या गुणांकनाची परीक्षा राहणार असल्याची माहिती आहे.
उघड्यावर कचरा टाकल्यास दंडाची आकारणी
या अभियानाच्या अनुषंगाने उघड्यावर कचरा टाकल्यास, उघड्यावर लघुशंका केल्यास मार्गावर घाण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, उघड्यावर शौच केल्यास यासंबंधीचा नियम अधिसुचित करून दंडाची आकारणी करण्यात येत असल्याचे सुतोवाच महापालिका प्रसासनाने केले आहे. वास्तविकत: या नियमांच्या अनुषंगाने अवलोकण केल्यास या नियमांचे सर्रास उल्लंघण होत असताना किती प्रकरणात कारवाई करून दंडाची आकारणी केली, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
उपभोक्ता दरानुसार कारवाई कुठे?
महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि विध्वंसक कचरा विल्हेवाट लावण्याकरिता शहरातील रहिवासी, स्थापत्य अभियंता, बिल्डर्स आणि कंत्राटदार यांना सन २०१६ च्या अधिसुचनेनुसार उपभोक्ता दर निश्चित करून कारवाई करण्याचे सुतोवाच महापालिकेने या अभियानाच्या निमित्ताने केले आहे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ शहरामध्ये लागू करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.
स्वच्छता 'अ‍ॅप'साठी १२५० गुण
शहरातील स्वच्छतेबाबत वारंवार असणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महानगरात स्वच्छता 'अ‍ॅप' सुरू करण्यात आलेले स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या पुस्तिकेच्या निर्देशानुसार टूल किटप्रमाणे कार्यवाही महानगर स्तरावर सुरू आहे. स्वच्छता अ‍ॅपसंदर्भात अनेक कार्यक्रमांद्वारे नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप सुरू करण्याचा आग्रह शासन धरत असल्याची चांगली बाब या निमित्ताने समोर आली आहे. या उपक्रमासाठी एक हजार २५० गुण राहणार आहेत.

Web Title: Three Star Ratings, Third Party Surveillance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.