कापूस आंदोलनाच्या थरारक आठवणी

By admin | Published: November 21, 2015 12:14 AM2015-11-21T00:14:39+5:302015-11-21T00:14:39+5:30

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने ...

The thrilling memories of the cotton movement | कापूस आंदोलनाच्या थरारक आठवणी

कापूस आंदोलनाच्या थरारक आठवणी

Next

४० वर्षे पूर्ण : दोन शेतकऱ्यांचा झाला होता मृत्यू
धामणगाव रेल्वे : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने कापसाच्या भाववाढीसाठी तालुक्यात झालेल्या ‘त्या’ थरारक आंदोलनाच्या आठवणी डोळ्यांसमोर दिसतात़ भाजप नेते अरूण अडसड यांच्या कानाजवळून गेलेली गोळी तसेच दुसऱ्या आंदोलनात तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा झालेला मृत्यूच्या आठवणी अंगावर शहारे आणतात़ शनिवार २१ नोव्हेंबरला या कापूस दिंडीच्या घटनेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत.
धामणगाव शहर पूर्वीच्या काळात कापसाची मोठी बाजारपेठ होती़ जिल्ह्यातील अनेक भागांतून धामणगाव शहरात त्या काळात कापूस विक्रीसाठी येत होता़ चार ते पाच दिवस कापसाचे मोजमाप तसेच विक्री होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या शहरात तब्बल पाच ते सहा दिवस मुक्कामी रहावे लागत असे. त्याकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कपाशीव्यतिरिक्त दुसरे उत्पादन घेतले जात नव्हते़ ४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून भाजप नेते अरूण अडसड यांनी कापूस दिंडी काढली होती़ नागपूरपर्यंत ३६२ किलो मीटर अंतरात पदयात्रा काढून तत्कालीन मुख्यमंत्री भोसले यांच्याकडून कापसाला भाव मिळवून घेतला होाता़ या दिंडीत भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते़
त्यानंतर शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष मोतीराम लहाने यांच्या नेतृत्वात कापसाच्या भाव वाढीसाठी हगि येथे कापूस सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते़ या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता़ अरूण अडसड यांच्या कानाजवळून गोळी गेली होती़ तिसरे आंदोलन कापूस भाव वाढीसाठी धामणगाव तालुक्यातील भातकुली रेणुकापूर येथे झाले होते़ त्यावेळी दोन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. गणेश शिंदे व हिरपूर येथील सुनील जावळकर या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर रवी बिरे नामक शेतकरी गोळीबारात गंभीर जखमी झाला होता़ कापूस भाववाढीसाठी झालेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणी सांगतात. आजही अनेक वयोवृध्द शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत़ ४० वर्षांपूर्वी याच दिवशी धामणगाव शहरात कापूस भाववाढीकरिता अरूण अडसड, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांनी कापूस दिंडी काढली होती़

Web Title: The thrilling memories of the cotton movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.