कांडली-कविठा रस्त्यावर मृत अर्भक फेकले
By admin | Published: January 21, 2016 12:33 AM2016-01-21T00:33:49+5:302016-01-21T00:33:49+5:30
नजीकच्या कांडली ते कविठा गजानन कॉलनी मार्गावर सात महिन्यांचे पुरुष जातीचे मृत अर्भक बुधवारी सकाळी १० वाजता आढळून आले.
अनैतिक संबंधांची परिणती? : अवैध गर्भपात केंद्र असल्याची चर्चा
परतवाडा : नजीकच्या कांडली ते कविठा गजानन कॉलनी मार्गावर सात महिन्यांचे पुरुष जातीचे मृत अर्भक बुधवारी सकाळी १० वाजता आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फे्रन्डस कॉलनी ते कांडली परिसरात अवैध गर्भपात केंद्र चालविण्यात येत असल्याच्या चर्चेलाही येथे ऊत आला होता.
गौलखेडा कुंभी येथे एक महिन्याच्या चिमुकलीला चुलीत जीवंत पेटवून हत्या करण्यात आली होती. तसेच सदर बाजार परिसरात एका मातेने तीन महिन्याच्या मुलीस सोडून पळ काढण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच बुधवारी रस्त्याच्या कडेला मृत अर्भक आढळून आल्याने विविध चर्चांना तोंड फुटले आहे. कांडली ते कविठा हा मार्ग सकाळी ९ वाजतानंतर वर्दळीचा असून सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तुरळक वाहतूक राहाते. नेहमीप्रमाणे चांदूरबाजार येथील एका शाळेत शिक्षक मंगेश गायकवाड या रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृत अर्भक आढळून आले. ही माहिती परतवाडा पोलिसांन मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
परिसरात अवैध गर्भपात कंद्र
फ्रेन्डस कॉलनी ते कांडली परिसरात एका घरामध्ये अवैध गर्भपात केंद्र चालविण्यात येत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होेती. कुमारी माता आण अनैतिक संंबंधातून राहिलेला गर्भ नष्ट करण्याचे काम येथे केले जाते, अशीही चर्चा होती. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत तेथे गर्भपात करण्यात येतो. याठिकाणी बाहेरच्या गावातील महिला व तरूणी गर्भपातासाठी येत असल्याची चर्चादेखील आहे. शासनाने गर्भपातावर बंदी घातल्यानंतर अवैध गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरांची संख्या वाढली असून पूर्वी दायी व खासगी रुग्णालयातील परिचारिका हे अवैध गर्भपात केंंद चालवित असल्याचीही चर्चा आहे.