गुरुवारी रात्री वादळी पाऊस : विजांच्या कडकडाटांसह गारपीटही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:35 PM2019-01-25T22:35:18+5:302019-01-25T22:40:29+5:30

परिसरातील सालोड, शिवरा, लोहगाव, तिघरा, मंगरूळ चव्हाळा, पिंपळगाव निपाणी आणि वाढोणा आदी गावात संत्रा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात गाटपीट झाल्याने नुकसान झाले आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पाहणी केली.

Thunderstorm rain on Thursday night: hailstorms with heavy rains and thunders | गुरुवारी रात्री वादळी पाऊस : विजांच्या कडकडाटांसह गारपीटही

गुरुवारी रात्री वादळी पाऊस : विजांच्या कडकडाटांसह गारपीटही

Next
ठळक मुद्देअकाली गारपीटगहू झोपलासंत्र्याचेही नुकसानवाढोणा रामनाथ परिसराला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा रामनाथ : परिसरातील सालोड, शिवरा, लोहगाव, तिघरा, मंगरूळ चव्हाळा, पिंपळगाव निपाणी आणि वाढोणा आदी गावात संत्रा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात गाटपीट झाल्याने नुकसान झाले आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पाहणी केली.
शेतातील अन्य पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान गहू पिकाचे झाले आहे. त्यामध्ये येथील सुमारे तीन लाख रूपयाचे ओंब्या आलेला गहू गारपीटमुळे पूर्ण झोपला. पिंपळगाव निपाणी येथे झालेल्या गारपीट आणि पावसामुळे १०० एकर शेतातील गव्हाचे नुकसान झाले. त्याची किंमत अंदाजे दोन लाख रूपये आहे. माळेगाव येथे ५० एकरमधील गहू पूर्णत: झोपला. सालोडमध्ये ४० एकर शेतामध्ये सुमारे ४०० पोते गव्हाचे नुकसान झाले आहे. मंगरूळ चव्हाळामध्ये ४० एकर शेतामधील अंदाजे एक लाखांच्या गव्हाचे नुकसान झाले आहे. परिसरात एकूण ८ ते १० लाख रूपयांचे गव्हाचे नुकसान गारपीटीमुळे झाले आहे. तसेच संत्रा पिकांचे ४ ते ६ लाखांचे नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी संत्रा व्यापाºयांना विकला आहे. परंतु अचानक मुसळधार पाऊस आणि गारा पडल्याने संत्रा गळून खाली पडला. संत्रा व्यापाºयांनी तोडून आपल्याला पूर्ण रक्कम मिळणार, अशी स्वप्न शेतकºयांची होती; परंतु पावसाने शेतकºयांचे हिरवे स्वप्न पिवळे केले आहे. गव्हाची मशागत, खत, कीटकनाशके आदींवर शेतकºयांचा प्रचंड खर्च झाला होता. परंतु अचानक आलेल्या पावसाने गव्हाला जमिनीवर झोपवले. त्यामुळे मशागतीचा खर्चही निघणार नाही. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक कर्जबाजारी होणार आहे. आता मशागतीला खासगी सावकारांकडून व्याजाने घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे झाडाला असलेला संत्रा गळून पडला. त्यामुळे व्यापाºयांनी इसार म्हणून दिलेली रक्कम आणि संत्री तोडायची कशी? अशा दुहेरी विंवचनेत शेतकरी सापडला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी विष्णू तिरमारे, पांडूरंग खेडकर, जनार्दन मिसाळ, मोहन घवळे, प्रकाश घवळे, सुभाष मिसाळ, अरूण बनकर, महिंद्रा लोणारे आदींनी केली आहे.
संत्र्याचे लाखो रूपयांचे नुकसान
मी नुकसानग्रस्त सर्वच गावांना भेट दिली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्वरीत अहवाल देण्याचे आदेश पटवाऱ्यांना दिले आहेत.
- मनोज लोणारकर
तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर.
तळेगाव दशासर परिसरात गारांचा पाऊस
तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व तळेगाव परिसरात गुरूवारी रात्री ७ ते ११ चे सुमारास मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. हवेत गारवा निर्माण झाला आहे. काल रात्री झालेल्या गारांच्या वर्षावाने रब्बी पिकांचे नुकसान झाले असून आकाशात अद्यापही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. तळेगाव परिसरात देवगाव, वाढोणा, मलातपूर, जळका (पट), महिमापूर, शेंदूरजना खुर्द, धनोडी, घुईखेड, पिंपळखुटा, कोठा फत्तेपूर, कोल्ही, फाळेगाव या परिसरात गारांचा पाऊस पडला. रब्बी पिकांची अतोनात हानी झाली असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
चांदूर रेल्वे परिसरात गारपीट
चांदूर रेल्वे : शहरात व सभोवतालच्या परिसरात २४ जानेवारीच्या रात्री ११.३० वाजता बोराएवढी गारपीट होऊन धो-धो पाऊस अचानक बरसला. ढगाळ हवामानामुळे हरभरा पिके धोक्यात येण्याच्या शक्यतेने शेतकºयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चांदूर रेल्वेचे तहसीलदार आर. एस. इंगळे यांनी शुक्रवारी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले. सातेफळ, घुईखेड, पळसखेड, धानोरा (म्हाली) व चांदूर रेल्वे शहरात गारपिटीसह पाऊस झाला. जोराच्या हवेमुळे गव्हाला फटका बसला. परंतु, जास्त गारपीट न झाल्याने तुर्तास तरी रब्बी पिकांचा धोका टळल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गात आहे. शुक्रवारीसुध्दा दिवसभर ढगाळ वातावरण होते.
धामणगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा
धामणगाव रेल्वे : गुरूवारी रात्री वादळी पाऊस व गारपिटीने तालुक्याला तडाखा दिला असून, सर्वाधिक नुकसान गहू, चना, संत्रा, तूर या पिकांचे झाले आहे दरम्यान आ. अरूण अडसड यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून सर्वेक्षणाचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेत.
गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जुना धामणगाव, वाठोडा, दाभाडा, विरूळ रोंघे, जळगाव आर्वी, तरोडा, कावली, वसाड, वाघोली, मंगरूळ दस्तगीर, जळगाव या भागात गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसला. शेतात उभा असलेला गहू या गारपिटीमुळे पूर्णता खाली झोपला तर, उभ्या तुरीचे नुकसान झाले. संत्रा, मोसंबीचा आंबिया बार पडला. आंब्याच्या झाडावर आलेल्या बार गारपिटीमुळे गळला. आ. अडसड यांनी तातडीने गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. जुना धामणगाव येथील नंदू ढाले यांच्या शेतात गव्हाची पाहणी केली. त्यानंतर तरोडा, दाभाडा व गारपीटग्रस्त गावाचा दौरा केला. दरम्यान, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याशी त्यांनी संपर्क साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी तालुका प्रशासनाला आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकºयांचे शेताचे सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार सचिन खाडे यांनी तलाठ्यांना दिले आहे. सभापती सचिन पाटील, धामणगावच्या सरपंच जयश्री पोळ, शाम गंधे, बंडू राऊत, राजू गोपाळ, प्रमोद ढाले, नंदू ढाले, नरेश व्यवहारे, माधव नागोसे, गजानन गोटाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Thunderstorm rain on Thursday night: hailstorms with heavy rains and thunders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.