अमरावतीत विजांच्या कडाकडाटासह गारपीट 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 19, 2023 06:08 PM2023-03-19T18:08:22+5:302023-03-19T18:08:41+5:30

शहरात रविवारी दुपारपर्यंत सूर्यप्रकाश असताना साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली.

Thunderstorm with lightning in Amravati | अमरावतीत विजांच्या कडाकडाटासह गारपीट 

अमरावतीत विजांच्या कडाकडाटासह गारपीट 

googlenewsNext

अमरावती : शहरात रविवारी दुपारपर्यंत सूर्यप्रकाश असताना साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यादरम्यान बोराएवढी गार पाच मिनिटांपर्यंत पडली. मात्र, कुठेही नुकसान झालेली नाही. रात्रीच्या वादळात शेगाव ते रहाटगाव मार्गावर एक झाड विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.

अचानक आलेला पाऊस व गारपिटीमुळे दुचाकीस्वारांनी कडेला आश्रय घेतला. चिखलदरा येथेही दुपारी पावसासह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे पाच तालुक्यातील २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा, कांदा, टरबूज व संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

Web Title: Thunderstorm with lightning in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.