देशात वाघ वाढले; पण...; विदर्भातील वाघ कंबोडियात जाणार!

By गणेश वासनिक | Published: April 16, 2023 04:28 PM2023-04-16T16:28:27+5:302023-04-16T16:28:40+5:30

देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

Tigers grew in the country; But...; Vidarbha tiger will go to Cambodia! | देशात वाघ वाढले; पण...; विदर्भातील वाघ कंबोडियात जाणार!

देशात वाघ वाढले; पण...; विदर्भातील वाघ कंबोडियात जाणार!

googlenewsNext

अमरावती : व्याघ्र गणनेत देशभरात वाघांची संख्या ३१६७ झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंद संचारलेला आहे. यात व्याघ्र प्रकल्पांचा सिंहाचा वाटा असला तरी अपुरे पडणारे जंगल आणि वाघांची कॉरिडॉरमुळे घुसमट वाढली आहे.भारतातील व्याघ्र प्रकल्पांना मोठी ताकद देण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

आजमितीस देशात ४२ च्यावर व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. देशातील जंगलामध्ये वाघांच्या संरक्षणात व्याघ्र प्रकल्पांचा मोठा वाटा मानला जातो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे व्याघ्र प्रकल्पांवर मॉनिटरिंग करते. या प्राधिकरणाची दिल्ली येथे २००५ मध्ये स्थापना झाली असली तरी कमी कालावधीत या प्राधिकरणाने वाघांच्या संख्येत वाढ करण्याची किमया केली आहे. किंबहुना वाघ तस्करीच्या बेहलिया टोळीचा बीमोड झाल्याने पूर्व भारतात वाघांची संख्या अलीकडे वाढल्याचे वास्तव आहे.

वाघ कसे वाढले?
जगात बेंगाल टायगर म्हणून भारतातील वाघांना अधिक महत्त्व आहे. जगभरातील १७ देशांमध्ये वाघांचे ५ ते १० टक्के अस्तित्व असून, जगभरातील वाघांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एकट्या भारतात ७५ टक्के एवढी संख्या वाघांची आहे. देशात दर चार वर्षांनी ३०० ते ५०० वाघ वाढले. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यात १५० ते २५० वाघांची वाढ आहे.

वाघांचे मृत्यूही तेवढेच
गत चार वर्षांत मध्य प्रदेश, महाराष्ट्रात किमान २०० वाघ विविध कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत वाघ मृत्युमुखी पडले आहेत. काही वाघ विजेचा धक्का लागून ठार झाले आहेत. त्यामुळे वाघांची संख्या पुन्हा कमी होणार नाही, याची काळजी घेणे काळाची गरज आहे.

कंबोडियात वाघ जाणार
विदर्भात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या २५५ च्यावर आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव असा संघर्ष गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील १० ते १२ वाघ हे कंबोडियात हलविले जाणार असून याबाबतचा करार भारत आणि कंबोडिया सरकारमध्ये झाल्याची माहिती आहे. मात्र, वाघ केव्हा पाठविणार, हे निश्चित झाले नाही. एकेकाळी कंबोडियात मोठ्या प्रमाणात वाघ होते. तथापि, शिकारींमुळे या ठिकाणी वाघ संपल्यागत आहे. भारतातून २५ पेक्षा जास्त वाघ कंबोडियात टप्प्याटप्प्याने जाणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ अन्य ठिकाणी हलविण्याबाबतचा सर्व्हे झाला आहे. केंद्र सरकारच्या एनटीसीए याबाबतची कार्यवाही करणार आहे. मात्र वाघ नेमके कुठे पाठविणार यासंदर्भात तूर्तास निश्चित झाले नाही.
- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्यमंत्री

व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या आकडेवारीवर एक नजर...
वर्षे                  संख्या
- २००६           १४११
- २०१०         १७०६
- २०१४         २२२६
- २०१८       २९६७
- २०२२         ३१६७

Web Title: Tigers grew in the country; But...; Vidarbha tiger will go to Cambodia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ