कोरोना काळात शुभा शेळके ठरल्या देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:22+5:302021-07-03T04:09:22+5:30
फोटो पी ०२ राजुराबाजार राजुरा बाजार : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभा शेळके यांची कोरोना ...
फोटो पी ०२ राजुराबाजार
राजुरा बाजार : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभा शेळके यांची कोरोना काळातील मोलाची भूमिका १४ गावातील रुग्णांना अवर्णनीय राहिली. कोरोनाबाधितत्साठी त्या देवदूत ठरल्या.
परिसरातील चौदा गावांच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत चौदा गावे येतात त्यात प्रामुख्याने राजुरा गावात कोरोना ' हॉटस्पॉट ' होता. तालुक्यात सर्वात जास्त कोरोनाच्या रुग्णाची संख्या होती सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते अनेकांना जीव गमवावा लागला सगळीकडे लोकडाऊन होता. या बिकट परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभा शेळके यांचा योग्य सल्ला, रुग्णांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी रुग्णांची विचारपूस व नियमित तपासणी संक्रमित रुग्णांच्या घरोघरी जाऊन त्याच्या नातेवाईकांना कर्मचारी पाठवून चौकशी केली. धीर दिला. गोरगरीब रुग्णांना आशेचा किरण जागविला. बऱ्याच रुग्णांना गृह विलीगिकरणात ठेवून कोरोनावर यशस्वी मात केली.
राजुरा आरोग्य केंद्र अंतर्गत राजुरा बाजार, अमडापूर, डवरगाव, वाडेगाव, काटी, वडाळा, गाडेगाव, वंडली, वघाळ, चिंचरगव्हाण, मोरचुंद, पवनी (संक्राजी), हातुरणा एवढी गावे येतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभा शेळके, डॉ. आकाश राऊत, डॉ. प्रगती नंदेश्वर, डॉ. गजानन सिरसाम कोरोना काळात सेवा देणारे वैशाख देशमुख, आरोग्य सहायक राजेश खाडे, गटप्रवर्तिका नागदिवे वाहनचालक हरिभाऊ निकम यांचाही मोलाचा वाटा होता.
कोट
आरोग्यविषयक कुठलेही कार्य असो माझा डॉक्टर या नात्याने ते कार्य प्रामाणिकपणे करणे हे कर्तव्यच आहे. मी ग्रामीण भागातील रुग्णांना शक्य तेवढे कर्तव्य पार पाडले. रुग्णांना येथील आरोग्य केंद्रात बरे करण्यासाठी मी प्रयत्नशील असते. कर्मचाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत.
- डॉ. शुभा शेळके,
वैद्यकीय अधिकारी,
राजुरा बाजार
कोट २
येथील आरोग्य केंद्रात डॉ. शुभा शेळके रुजू झाल्यापासून गरीब रुग्णांची बाह्यरुग्णांची तपासणी सेवा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. गावातील गोरगरीब रुग्ण समाधानी आहे.
- प्रशांत बहुरूपी,
उपसरपंच, राजुरा बाजार
कोट ३
आमच्या वंडली गावात डॉ. शुभा शेळके यांनी लसीकरण कॅम्प आयोजित करून सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले.
- चंद्रशेखर भोकरे,
सरपंच, वंडली ता वरूड
020721\img-20210630-wa0013.jpg
वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभा शेळके
प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुरा बाजार