अवकाळी, गारपीटने १९ हजार हेक्टर बाधित; ११ हजार हेक्टरमधील गहू, हरभऱ्याला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 07:20 PM2020-03-18T19:20:29+5:302020-03-18T19:21:01+5:30

धामणगाव तालुक्यात ४.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये पाच घरांचे अंशत: नुकसान झाले.

At the time, hailstorm affected 19,000 hectares; 11 Thousands of hectares of wheat, green beans | अवकाळी, गारपीटने १९ हजार हेक्टर बाधित; ११ हजार हेक्टरमधील गहू, हरभऱ्याला फटका 

अवकाळी, गारपीटने १९ हजार हेक्टर बाधित; ११ हजार हेक्टरमधील गहू, हरभऱ्याला फटका 

Next

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळासह झालेला अवकाळी पाऊस व गारपीटचा नऊ तालुक्यांतील १८ हजार ९२० हेक्टरमधील रबीसह फळपिकांना फटका बसला. या आपत्तीमुळे १० हजार ८३६ हेक्टरमधील कपाशीसह गहू व हरभरा तसेच ८ हजार ३४ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. हातातोडांसी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

सध्या रबीचा हंगाम सुरू आहे. सवंगवणी केलेल्या, गंजी लावलेल्या तसे उभ्या असलेल्या पिकांचे या गारपीट व वादळाने नुकसान झाले आहे. अमरावती तालुक्यात २.९ मिमी पाऊस पडला. यामध्ये १७० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. भातकुली तालुक्यात वाठोडा शुक्लेश्वर येथे १.१० हेक्टरमधील निंबू, १० हेक्टरमधील गहू व ढंगारखेडा येथे दोन घरांचे टिन उडाल्याने नुकसान झाले.

धामणगाव तालुक्यात ४.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये पाच घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव तालुक्यात २.९ मिमी व मोर्शी तालुक्यात १०.२ मिमी पाऊस पडला. या दोन्ही तालुक्यात पिकांचे अंशत: नुकसान झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ९.२ मिमी पाऊस पडला. येथे धनेगावला गोठ्यावर वीज पडल्याने गाय व वासराचा मृत्यू झाला व ४० घरांचे अंशत: नुकसान झाले. धारणी तालुक्यात सिनबंध गावांमध्ये वादळाने काही घरांचे टिनपत्रे उडाली, तर अचलपूर तालुक्यात वादळाने काही घरांचे टिनपत्रे उडाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
 
२१ मार्चपर्यंत पाऊस, गारपीटची शक्यता

अमरावती : छत्तीसगड आणि सभोवताली ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पूर्व विदर्भ ते तामिळनाडू द्रोणिय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भात २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता वर्तविली आहे. हा पाऊस पश्चिम विदर्भात पडण्याची शक्यता अधिक आहे. हे वातावरण कमी अधिक प्रमाणात २१ तारखेपर्यंत राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
 
 असे आहे तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)
तालुका              शेतीपिके             फळपिके       एकूण
अमरावती          १७०.००              ——           १७०
भातकुली             ——                ०१.१०          ०१.१०
मोर्शी                   ८१.००              ४५.००          १२६.००
दर्यापूर                 ०६.००               ——           ०६.००
नांदगाव               ७२२.००             १४.६२         ७३६.६२
अंजनगाव           ५२६.२०             ३५.५०         ५६१.७०
अचलपूर           ९८.९५               ५०१.०७         ६००.०२
चांदूरबाजार       ९२८२.००           ७४३७.००       १६७१९.००
एकूण                 १०८८६.१५         ८०३४.२९       १८९२०.४४

Web Title: At the time, hailstorm affected 19,000 hectares; 11 Thousands of hectares of wheat, green beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.