थकवा येतोय, काय करू? रुग्ण घटले, हेल्पलाईनवर कॉल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:49+5:302021-06-22T04:09:49+5:30

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारानंतर घरी आयसोलेटेड राहण्याकरिता परवानगी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे भरल्यानंतर किंवा बेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर परवानगी ...

Tired, what to do? Patients decreased, calls to the helpline increased | थकवा येतोय, काय करू? रुग्ण घटले, हेल्पलाईनवर कॉल वाढले

थकवा येतोय, काय करू? रुग्ण घटले, हेल्पलाईनवर कॉल वाढले

Next

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारानंतर घरी आयसोलेटेड राहण्याकरिता परवानगी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे भरल्यानंतर किंवा बेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर परवानगी दिली जायची. या दरम्यान रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जायची. १६६८७ लोकांनी होम आयसोलेशनसाठी फॉर्म भरले. त्यापैकी १६११ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला असून, ७६ रुग्ण सद्यस्थितीत होम आयसोलेटेड असल्याची माहिती महापालिकेतून मिळाली.

जिल्ह्यात कोरोनाने दुसऱ्या लाटेत कहरच केला. रोज आज किती रुग्ण, किती मृत्यू, याकडेच नागरिकांचे लक्ष रहायचे. लोकमतमध्ये नियोजित कॉलममध्ये अपडेट येत राहिल्याने वाचकांच्या घरी पेपर पोहचताच आधी त्या बॉक्सकडे नजर जायची.

बॉक्स

महानगरातून सर्वाधिक कॉल्स

महापालिकेच्या होम आयसोलेशन विभागातून दररोज शेकडो रुग्णांना कॉल करून प्रकृतीची विचार केली गेली. यात पहिल्या लाटेत कमी रुग्णसंख्या असताना कोरोनाची भीती मात्र अधिक होती. त्यामुळे रुग्णांची दिवसातून तीन वेळा फोनवरून माहिती घेण्यात येत होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे एकदाच फोन करून माहिती घेता आली. त्यापैकी ४०० ते ५०० रुग्णांची प्रकृती आयसोलेशनमध्ये असताना बिघडल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयापर्यंत आणण्याची, औषधोपचाराची व डॉक्टरांचा सल्ला घेण्याची व्यवस्था करून देण्यात आली.

--

ग्रामीण भागात आशांद्वारा सर्वेक्षण

कोरोनाच्या दुसऱ्या लाोचा प्रादुर्भाव प्रकर्षाने ग्रामीण भागात सर्वाधिक झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक गावात हजार लोकसंख्येमागे एका आशाची नेमणूक करून प्रत्येक्ष सर्वेक्षण करण्यात आले. तेथे फोन कॉलवर माहिती न घेता प्रत्यक्ष भेट देऊन लक्षणे पाहिली जात होती. आशांद्वारा आरोग्य विभागाला माहिती पोहचविली जात होती.

--

महानगरात लोकसंख्यानिहाय १३ कॉल सेंटर

अमरावती शहराचा व्याप वाढल्याने एका सेंटरवरून सर्व रुग्णांना कॉल करणे शक्य नसल्याने लोकसंख्यानिहाय १३ कॉल सेंटर स्थापन करण्यात आले आहे. ५२ हजारांवर लोकसंख्या एका सेंटरअंतर्गत असे नियोजन करण्यात आले. त्या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला होम आयसोलेटेड स्थितीत प्रकृतीची विचारणा करण्यात आली. दरम्यान तापमान किती? ऑक्सिजन लेव्हल किती, घरावर होम आयसोलेशनचे बोर्ड लागले काय? आरोग्य सेतू ॲप मोबाईलमध्ये अपलोड केले आहे काय? कोणत्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे? कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार आहेत काय, याबाबत विचारणा केली जायची.

--

डोकेदुखी वाढलीय, काय करू?

रुग्णांना कॉल करून प्रकृतीची विचारणा केल्यास तुम्ही काय करणार? दिवसातून तीन वेळ फोन करून फायदा काय? आमचे आम्ही पाहू, अशाप्रकारे उत्तर मिळत असल्याने डोकेदुखी वाढतेय, काय करू, असा सवाल उपस्थित होत आहे.

पाॅइंटर

तारीख फोन कॉल

१ ते १५ मे २६१६

१६ ते ३१ मे १४४०

१ ते १५ जून ४२१

१६ ते २० जून ३५

याव्यतिरिक्त १३ हेल्पलाईन कॉल सेंटरवरून मे महिन्यात ४०३ कॉल, तर १ ते २० जून दरम्यान २६० कॉल अंदाजे करण्यात आल्याची माहिती आहे.

ग्रामीण

Web Title: Tired, what to do? Patients decreased, calls to the helpline increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.