आजपासून चिखलदरा पर्यटन महोत्सव
By admin | Published: February 25, 2017 12:06 AM2017-02-25T00:06:24+5:302017-02-25T00:06:24+5:30
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी चार दिवस पर्यटकांसाठी राहणार असून ....
रंगारंग कार्यक्रम : सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते उद्घाटन
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी चार दिवस पर्यटकांसाठी राहणार असून वित्त व नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार जिल्ह्यातील आमदार, खासदार, प्रमुख अतिथि ंम्हणून उपस्थित राहतील. उद्घाटनाला खा.आनंदराव अडसूळ, खा.रामदास तडस, आ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, प्रभुदास भिलावेकर, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवि राणा, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज, मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड जिल्हाधिकारी किरण गित्ते पर्यटन आदी उपस्थित राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
चार दिवस भरगच्च कार्यक्रम
शनिवार २५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या चिखलदरा पर्यटन महोत्सवामध्ये विविध रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आले असून विविध स्पर्धा निसर्गरम्य स्थळांना भेटी, पॅरासेलिंग, व्हैलीककासींग, घोडा सफारी,जंगल सफारीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.