आज विराजणार गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:46 PM2019-09-01T23:46:45+5:302019-09-01T23:47:33+5:30

मुंबई, पुणे शहरानंतर अंबानगरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकर महिनाभरापूर्वीच गणेश उत्सवाच्या तयारीला लागले होते. गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. आता गणेश स्थापनेची प्रतीक्षा संपली आहे.

Today is Coming Ganpati | आज विराजणार गणराया

आज विराजणार गणराया

Next
ठळक मुद्देउत्साह शिगेला : कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांचा उत्साह सोमवारपासून १० दिवस शिगेला पोहोचणार आहे. गणेश आगमनाची आतुरता आता संपली आहे. धुमधडाक्यात, गुलाल उधळत व जल्लोषात गणरायाचे स्वागतासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. गणेश उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुंबई, पुणे शहरानंतर अंबानगरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकर महिनाभरापूर्वीच गणेश उत्सवाच्या तयारीला लागले होते. गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. आता गणेश स्थापनेची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारपासून अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची रंगत दिसणार आहे. सार्वजनिक मंडळांच्यावतीने नेत्रदीपक व डोळे दीपविणारे देखावे, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही रेलचेल अशा भक्तीमय वातावरणामुळे भक्तांची दहा दिवस गणेश आराधना चालणार आहे. बच्चे कंपनीपासून आबालवृद्धापर्यंत सर्व जण लाडक्या गणरायांचे आगमनात मग्न राहणार आहे.

शहरात ४९२ गणेशमूर्तींची स्थापना
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यंदा ४९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. तसेच ४० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविल्या जाणार आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील ६४, कोतवाली २९, खोलापुरी गेट ३६, भातकुली २०, गाडगेनगर १०४, नागपुरी गेट १४, वलगाव ४५, फ्रेजरपुरा ६८, बडनेरा ६४ आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे.

Web Title: Today is Coming Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.