आज घराघरांत नवा झाडू, सूप, तिजोरीत कुबेराची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:04 PM2017-10-16T22:04:02+5:302017-10-16T22:04:26+5:30
यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतेय। धन-धान्य समृध्दी मे देही दापय स्वाहा।।
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे :
यक्षाय कुबेराय वैश्रवणाय
धन-धान्य अधिपतेय।
धन-धान्य समृध्दी मे
देही दापय स्वाहा।।
या मंत्राने भगवान धन्वंतरीची पूजा करतात़ कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलक्ष घेवून प्रकट झाले़ त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले़ आज धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य व आरोग्य लाभण्यासाठी घराघरात नवा झाडू, सूप व तिजोरीत कुबेराची पूजा केली जाणार आहे़
दिवाळी या मांगल्याच्या सणाची सुरुवात वसूबारसला होते. दिवाळीच्या दुसºया दिवशी धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा आहे़ घरात नवा झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करण्यात येते़ सायंकाळी दीपप्रज्ज्वलन करून घर, दुकानाची पूजा करण्यात येते़ मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावण्याची परंपरा आजही घराघरांत जोपासली जाते. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाच्या खरेदीला या दिवशी प्राधान्य देतात़ कार्तिक स्रान करून मंदिरात तीन दिवस दिवे लावण्यात येतात़ कुबेराची पूजा करताना व्यवसायाच्या ठिकाणी शुभमुहूर्तावर नवीन कापड टाकतात़ संध्याकाळनंतर १३ दिवे लावून कुबेराची पूजा करण्यात येते़ धनत्रयोदशीच्या सायंकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावण्यात येतो़