आजपासून अभियांत्रिकीच्या परीक्षा, ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:47+5:302021-03-22T04:12:47+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवार, २२ मार्चपासून तर ५ एप्रिल या ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवार, २२ मार्चपासून तर ५ एप्रिल या कालावधीत होऊ घातल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडविजणे बंधनकारक असून, प्रत्येक प्रश्नाला असेल दोन गुण दिले जाणार आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांचे पूर्वनियोजन करण्यात आले असून, अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा विषम सत्र व अंतिम सत्र २२ मार्च ते ५ एप्रिल २०२१ या दरम्यान तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सम सत्र (अंतिम सत्र वगळून) महाविद्यालय स्तरावर ६ एप्रिल ते १० एप्रिल २०२१ या कालावधीत संपन्न होतील. त्याशिवाय अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा व्यतिरिक्त उर्वरित अभ्यासक्रमांचे विषम सत्र व अंतिम वर्ष, अंतिम सत्रच्या प्रात्याक्षिक परीक्षा १ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान संपन्न होणार असून, लेखी परीक्षांच्या तारखा परीक्षा विभागाद्वारे नंतर जाहीर करण्यात येतील.
अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा व्यतिरिक्त उर्वरित अभ्यासक्रमांचे सम सत्र (अंतिम वर्ष, अंतिम सत्र वगळून) महाविद्यालय स्तरावर प्रात्याक्षिक परीक्षा १ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान आणि लेखी परीक्षा ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान संपन्न होतील. केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाच्या अभ्यासक्रमाची आणि थेट द्धितीय वर्षाला प्रवेशित होणाऱ्या अभ्यासक्रमाची तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील सत्र - १ व २ ची परीक्षा ३० एप्रिल २०२१ च्या पुढे विद्यापीठ स्तरावर संचालित करण्यात येईल.
---------------------
परीक्षांचे संचालन निदेश क्र. ५/ २०२१ नुसार संपन्न होणार आहे. वेळापत्रक व इतर बाबींसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. ४० पैकी ३० प्रश्न विद्यार्थांना सोडविणे अनिवार्य असेल. महाविद्यालयांनी विद्यार्थांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करावे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
------------------------------------------