आज ५२ सेकंदांसाठी सावली सोडणार साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:09+5:302021-05-25T04:13:09+5:30
(फोटो) अमरावती : कोणी सोबतीला राहो अथवा न राहो, आपली सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, ...
(फोटो)
अमरावती : कोणी सोबतीला राहो अथवा न राहो, आपली सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, ही सावलीदेखील मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ५२ सेकंदांसाठी आपल्यासोबत राहणार नाही. ही एक खगोलशास्त्रीय घटना अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे.
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात व कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना मात्र वर्षातून दोन वेळा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवास येते. जेव्हा सूर्य डोक्यावर आलेला असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणू सावली गायब झाल्याच हा रोमांचकारी अनुभव असतो. खगोलप्रेमी अमरावतीकरांना हा रोमांच २५ मे रोजी अनुभवता येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.
कोट
एक खगोलशास्त्रीय घटना आहे. २५ मे रोजी दुपारी १२.३० वाजता ५२ सेकंदांसाठी सावली गायब होण्याचा प्रकार अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे.
- विजय गिरूळकर, हौसी खगोल अभ्यासक