उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:08 PM2019-03-18T23:08:55+5:302019-03-18T23:09:33+5:30

लोकसभा निवडणुकीकरीता मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता २६ मार्चपर्यत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारल्या जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

From today's application process for the candidature | उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून

उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, अर्जाला २६ मार्च अंतिम तारीख

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीकरीता मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता २६ मार्चपर्यत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारल्या जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
उमेदवार किंवा सुचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी,अमरावती यांच्याकडे अर्ज दाखल करता येणार आहे व याच ठिकानी अर्ज उपलब्ध देखील आहेत. एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी २७ मार्च, अर्जाची माघार २९ मार्चला उमेदवार किंवा त्याने लेखी प्राधिकार दिलेल्या सुचकाला घेता येईल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यत मतदान होणार आहे. मतदान यंत्र नेमानी गोडावून येथे ठेवण्यात येणार आहे व याच ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
उमेदवारी अर्ज नमुना २ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कक्षात उमेदवारासहीत पाच व्यक्ती उपस्थित राहू शकतात. उमेदवारी अर्जासोबत आयोगाचे आदेशनुसार विहित प्रपत्रातील २६ व्या क्रमांकाचे शपथपत्र हे शपथआयुक्त, प्रथम श्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्या समोर प्रमाणबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील कोणताही रकाना रिक्त असता कामा नये तसेच भाग ‘अ’ मध्ये नमुद ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दुरध्वनी क्रमांक व समाजमाध्यम खाते असल्यास नमुद करणे आवश्यक आहे व उमेदवाराला अर्ज सादर करण्याचे किमान एक दिवस अगोदर निवडणूक खर्चासाठी स्वताचे बँकेचे खाते उघडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॅलेट युनिटवर यंदा उमेदवारांचा फोटो
मतदान यंत्रावरील बॅलेट युनिटवर यंदा उमेदवारांचा फोटो राहणार आहे. उमेदवाराचे नाव व चिन्ह यांच्या मधात हा फोटो राहणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करतांना आचारसंहिते संदर्भात बुकलेट देण्यात येणार आहे तसेच सोमवारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधीची बैठक घेण्यात येवून उमेदवारी अर्जातील माहितीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व्हिस व्होटरसाठी इलेक्ट्रॉनिक्स व्होटर सिस्टिम
जिल्ह्यातील तीन हजार सैन्यदलातील जवानांनी मतदानासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स व्होटर सिस्टिमद्वारे त्यांना मतदान करता येणार आहे. यावेळचे बॅलेट तयार झाल्यावर रेजिमेंटला पाठविले जाणार आहे. यापूर्वी सर्व्हीस व्होटरचे मतदान हे पोष्टल बॅलेट पद्धतीने व्हायचे त्यामुळे विलंब लागायचा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
१९५० वर ७०० मतदारांच्या प्रक्रिया
मतदारांना त्यांचे मतदानविषयक माहितीसाठी जिल्हा प्रशासनाचेवतीने १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. यावर या आठवड्यात किमान ७०० मतदारांनी चौकशी केलेली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघन होत असल्याबाबत ‘सी व्हिजिल’ या मोबाईल अ‍ॅपवर आतापर्यंत आठ तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
८८ मतदान केंद्र वाढले, एकूण २६९५
या निवडणुकीसाठी ८८ मतदान केंद्रात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव आयोगाला पाठविला होता. त्यामुळे केंद्रवाढ होऊन जिल्ह्यात एकूण २६९५ केंद्र झाले आहेत. आतापर्यंत ४८६ शस्त्रे जप्त करण्यात आलेली आहेत. ४५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. १९४ बेलेबल व नॉनबेलेबल वारंट बजावण्यात आले आहे व चेकपोस्टवर ६ केसेस मद्यवाहतूक व एक पिस्टल संदर्भात करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.

Web Title: From today's application process for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.