आजचा दिवस तब्बल १३ तास १३ मिनिटांचा; दिवस मोठा अन् रात्र राहणार लहान

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 19, 2024 07:09 PM2024-06-19T19:09:43+5:302024-06-19T19:09:53+5:30

१३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार

Todays day is about 13 hours and 13 minutes The day will be long and the night will be short | आजचा दिवस तब्बल १३ तास १३ मिनिटांचा; दिवस मोठा अन् रात्र राहणार लहान

आजचा दिवस तब्बल १३ तास १३ मिनिटांचा; दिवस मोठा अन् रात्र राहणार लहान

अमरावती : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत राहते. या परिक्रमेत २० जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस राहील. १३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला आहे. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सर्वात जास्त सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे दिसतो. या बिंदूला ‘समर सोल्स्टाईश’ म्हणतात. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा सर्वात मोठा असतो व रात्र लहान असते.

दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे, आपण नेहमीच अनुभवत असतो २० जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायान सुरू होते. सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास उत्तरायन व दक्षिणायन सहज लक्षात येऊ शकते.
खगोलप्रेमींनी २० जून रोजी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे कालमापन करावे व सर्वात मोठ्या दिवसाचा अनुभव घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

Web Title: Todays day is about 13 hours and 13 minutes The day will be long and the night will be short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.