तीन पंचायत समितीच्या २० गणांसाठी आज मतदान
By admin | Published: November 22, 2014 10:52 PM2014-11-22T22:52:25+5:302014-11-22T22:52:25+5:30
जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे.
तिवसा/धामणगाव/चांदूररेल्वे : जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. महसूल वगळता निवडणूक प्रक्रियेतील १३०७ कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल.
तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३९ उमेदवार रिंंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार तिवसा गणात आहेत. तिवसा पंचायत समितीत तिवसा, वरखेड, मारडा, कुऱ्हा, मोझरी, व वऱ्हा या सहा गणांचा समावेश आहे. तिवसा येथे १५ हजार ७६९, वरखेड गणात १३ हजार ८८६, कुऱ्हा गणात १५ हजार ११७, मारडा गणात १४ हजार ११२, मोझरी गणात १४ हजार ५०७ व वऱ्हा गणात १३ हजार ७६६ असे एकूण ८७,१५७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी तालुक्यात १०३ मतदान केंद्र आहे. महसूल वगळता ४०७ कर्मचाऱ्यांनी शनिवारी मतदान केंद्रांचा ताबा घेतला. या निवडणुकीत १०३ मतदानयंत्रांचा वापर होईल. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. सोमवारी २४ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात मतमोजणी सुरु होईल. चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३७ उमेदवार भाग्य अजमावणार आहेत. घुईखेड, सातेफळ,आमला, पळसखेड, मालखेड व राजुरा या सहा गणांचा समावेश आहे. घुईखेड गणात ५ हजार ६४६ पुरुष तर ५ हजार २७४ महिला मतदार आहेत. निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.