आज थंडावणार प्रचारतोफा

By admin | Published: October 12, 2014 11:28 PM2014-10-12T23:28:13+5:302014-10-12T23:28:13+5:30

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असून सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावतील. अंतिम काही तासांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत

Today's thunderstorm propaganda | आज थंडावणार प्रचारतोफा

आज थंडावणार प्रचारतोफा

Next

निवडणूक : प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची धडपड
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असून सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावतील. अंतिम काही तासांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष व उमेदवारांकडून होत आहे. प्रचार पदयात्रा, रोड शो, वाहन रॅली, महापदयात्रांनी आठही मतदारसंघ ढवळून निघाले.
१५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवार १३ आॅक्टोबरपासून प्रचार बंद होणार आहे. मुदतीनंतर होणारा छुपा प्रचार, मतदारांना दिली जाणारी प्रलोभने यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात फिरते पथक लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी असे आठ मतदारसंघ आहेत.
यापूर्वी दर्यापूर अनुसूचित जाती व मेळघाट अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. जिल्ह्याची मतदारसंख्या २२,१५,४६० इतकी असून २५१७ मतदान केंद्र आहेत.
यासाठी १०,६४४ अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत. १०७२ अधिकारी व कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. टपाली मते २ आॅक्टोबरपर्यंत पाठविण्यात आली आहेत.
निवडणूक प्रक्रियेमधील कर्मचाऱ्यांना मतपत्रिकादेखील देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे मतदान केंद्रनिहाय चमू तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Today's thunderstorm propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.