प्रसाधनगृह जागेचा तिढा सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:19 PM2018-12-03T22:19:32+5:302018-12-03T22:19:57+5:30

शहरात वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहांसाठी काही ठिकाणी जागेचा अडथळा आलेला असल्याने ती रखडली आहेत. यासाठी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी हे स्वच्छता विभागाशी संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दोन महिण्यात तीन ठिकाणचे प्रसाधनगृह पुर्णत्वास जाणार असल्याने त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

The toilet will be used for the purpose | प्रसाधनगृह जागेचा तिढा सुटणार

प्रसाधनगृह जागेचा तिढा सुटणार

Next
ठळक मुद्देआयुक्तांकडून आढावा : दोन महिन्यांत तीन ठिकाणी होणार लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहांसाठी काही ठिकाणी जागेचा अडथळा आलेला असल्याने ती रखडली आहेत. यासाठी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी हे स्वच्छता विभागाशी संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दोन महिण्यात तीन ठिकाणचे प्रसाधनगृह पुर्णत्वास जाणार असल्याने त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल पीआयएल क्र. ९८/२०११ च्या निर्देशाने महापालिकेच्या हद्दीत वर्दळीच्या २७ ठिकाणी प्रसाधनगृहांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये मोठ्या बाजारपेठा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, प्रभागातील मुख्य रस्ते आदी गजबजलेल्या ठिकाणी या प्रसाधनगृहाची निर्मिती केल्या जाणार आहे. यामधील सहा ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी जागा अन्य विभागाच्या अखत्यारित असल्याने त्या ठिकाणी अडसर निर्माण झालेला आहे. हा तिढा सूटावा यासाठी सोमवारी महापालिका आयुक्त संजय निपाने यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी जागेअभावी रखडलेले प्रसाधनगृह व कंत्राटदाराचे देयके आदींविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पीडीएमसी, महसूल विभागासह अन्य विभागाच्या जागेअभावी कामे रखडली असल्याने समिती सदस्य प्रणय कुळकर्णी या विभागाच्या भेटी घेऊन जागेचा प्रश्न निकाली काढणार आहे. काही ठिकाणी एनओसीमुळे कामे रखडली असल्याने महापालिकेचे सबंधित अभियंत्यांना याविषयीच्या सुचना बैठकीत देण्यात आल्यात. गाडगेबाबा समाधीच्या समोरील भागात असणार, प्रभात चौक व सक्करसाथ येथील प्रसाधनगृहाचे काम दीड महिण्यात पुर्णवास जाणार असल्याने लोकार्पण करण्यात येणार आहेत. दर १५ दिवासांनी समितीची बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला नगरसेविका निलिमा काळे, नगरसेवक प्रणय कुळकर्णी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, श्रीकांत चव्हाण, निवेदिता घार्गे, प्रशांत शेळके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी अजय जाधव, शहर अभियंता रविंद्र पवार, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, उपअभियंता प्रमोद इंगोले यांची उपस्थिती होती.
या ठिकाणी होणार प्रसाधनगृह
नवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा मंदिरासमोरिल जागा, पीडीएमसी, शेगाव चौक, कठोरा नाका, राजकमल चौकातील उड्डानपुलाखाली, अंबादेवी मार्ग, मालटेकडी रस्त्यावर, चित्रा चौक, इतवारा बाजार, प्रभात चौक, नगर वाचनालय, नमुना, राजापेठ शाळेजवळ, राजापेठ अंबानाला, पुज्य बाबा दरबार, सिटी कोतवाली समोर, महापालिका मुख्यालय, यशोदानगर, चपरासी पुरा, शुक्रवारी बाजार, दक्षिण प्रभाग कार्यालय, बडनेरा जुनीवस्ती दर्ग्याजवळ, नवाथे प्लॉट नाक्याजवळ, दस्तूर नगरात गोरक्षण जवळ, जवाहर गेट सराफा बाजार.

सातत्याने हा विषय लावून धरला. त्यामुळे सहा ठिकाणची कामे पुर्णत्वास जात आहे. तीन ठिकाणी दोन महिन्यात लोकार्पण होईल. काही ठिकाणी जागेची अडचण असल्याने सबंधित विभागांची आपण स्वत: भेटी घेवू.
- प्रणय कुळकर्णी
स्वीकृत नगरसेवक

Web Title: The toilet will be used for the purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.