पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:38 PM2018-01-02T22:38:30+5:302018-01-02T22:38:57+5:30

महानगरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने महिला, युवतींची होणारी कुचंबणा लक्षात घेता पुणेच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे साकारले जाणार आहेत.

Toilets at 27 places in Pune city on the lines of Pune | पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे

पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रणय कुळकर्णी यांचा पुढाकार: महापालिका स्थायी समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महानगरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने महिला, युवतींची होणारी कुचंबणा लक्षात घेता पुणेच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे साकारले जाणार आहेत. भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून स्थायी समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली असली तरी शहरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे वास्तव आहे. विशेषत: महिला, युवतींची कुचंबणा होते. यापूर्वी सार्वत्रिक ठिकाणी फायबर टॉयलेटची उभारणी करण्यात आली. पण, ते फायबर टॉयलेट कसे होते, हा संशोधनाचा विषय असल्याचे नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळविले होते. मात्र, शहरात विविध ठिकाणी प्रसाधनगृहे असावेत, यासाठी त्यांनी महापालिकेच्या गतआमसभेत प्रश्न क्रमांक १७२ अन्वये सार्वजनिक शौचालये आणि मूत्रिघरांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रसाधनगृहांची माहिती वजा वस्तुस्थिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग देऊ शकला नाही. त्यामुळे कुळकर्णी यांनी आक्रमक पावित्रा घेत आठ लाख लोकसंख्येच्या महानगरात सार्वत्रिक प्रसाधनगृहे साकारू शकत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. यावेळी प्रशासनाने प्रसाधनगृहांसाठी जागा दुरुस्ती खर्च, पाणीव्यवस्था, बांधकामासाठी निधी आदींबाबत समर्पक उत्तरे दिले नाहीत. परिणामी पुणेच्या धर्तीवर अमरावती महानगरातही पक्के बांधकाम असणारे प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, अशी मागणी प्रणय कुळकर्णी यांनी केली. त्यांच्या मागणीला सभागृहात अन्य सदस्यांनीसुद्धा समर्थन दिले. अखेर प्रशासनाने महानगरात सार्वत्रिक जागी २७ प्रसाधनगृहे साकारण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक कुळकर्णी यांनी नागरिकांच्या समस्यांवर लक्ष वेधल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
येथे साकारणार प्रसाधनगृहे
नवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा समाधीजवळ, पंचवटी पीडीएमसी, शेगाव चौक, कठोरा नाका, राजकमल उड्डाणपुलाखाली, अंबादेवी मार्ग, मालटेकडी रस्त्यालगत, चित्रा चौक, इतवारा बाजार मार्केट, प्रभात चौक, नगर वाचनालय, नमुना चापोरकर कॉम्प्लेक्स, राजापेठ शाळेजवळ, राजापेठ अंबानाला, पूज्य बाबा दरबार, सिटी कोतवालीसमोर, राजकमल महापालिका मुख्यालय, यशोदानगर, चपराशीपुरा शुक्रवार बाजार, दक्षिण प्रभागीय कार्यलय, बडनेरा जुनीवस्ती दर्ग्याजवळ, नवाथे प्लॉट नाकाजवळ, दस्तुरनगर गौरक्षण समोर, सराफा बाजार जवाहर गेट या २७ जागांचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक ९८/२०११ च्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वत्रिक जागेवर प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, असे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका यात माघारल्याने ही बाब लक्षात आणून दिली.
- प्रणय कु ळकर्णी, स्वीकृत नगरसेवक

Web Title: Toilets at 27 places in Pune city on the lines of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.