टोलमुक्तीसाठी नांदगावपेठ टोल नाका कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:35 PM2018-04-14T22:35:23+5:302018-04-14T22:35:23+5:30
टोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात नागरिकांनी शनिवारी ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. मोर्शी-वरुड कृती समिती, वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
अमरावती : टोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात नागरिकांनी शनिवारी ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. मोर्शी-वरुड कृती समिती, वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
अमरावती-नागपूर महामार्गावरील नांदगावपेठ येथे आयआरबीने टोल उभारून वसुली सुरू केली तेव्हापासून मोर्शी व वरूड येथून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही टोल भरावा लागत आहे. त्यांना ९० रुपये टोलचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. थोड्या अंतरावर जाण्यासाठीही टोल वसुल केली जात असल्याने हा अन्यायच आहे. आता टोलमुक्तीसाठी मोर्शी व वरुड येथील नागरिक एकत्रित आले असून, त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. टोलनाक्याविरोधात आतापर्यंत १० हजारांवर नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या टोलविरुद्ध अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतले. याबाबत नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे यांना निवेदने देण्यात आले. मात्र, अद्याप नागरिकांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अखेर नागरिकांनी पुढाकार घेत शनिवारी टोलमुक्तीसाठी आंदोलन पुकारले. हे पाहून हायवे आथोरिटीचे अधिकारी कार्यालयात दाखल झाले. आंदोलनकर्ते व अधिकाºयांमध्ये चर्चा झाली. मात्र, वृत्त लिहित्तोर पुढे काय निर्णय झाला, हे कळू शकले नाही.
टोलमुक्तीसंदर्भात होईस्तोवर हलके वाहन ५, तर जड वाहन १० रुपये टोल भरण्याची तयारी कृती समितीने दर्शविली आहे. या सर्व वाहनांकडून पाच ते दहा रुपयांपर्यंतचा टोल घेण्यात यावा, अशी अपेक्षा समितीला आहे.