आई- वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:36+5:302021-08-22T04:16:36+5:30
अमरावती : फेसबूकवरून ओळख झालेल्या २० वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर लग्न कर, अन्यथा आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी ...
अमरावती : फेसबूकवरून ओळख झालेल्या २० वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर लग्न कर, अन्यथा आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला पळवून नेऊन एका मंदिरात नेऊन लग्न केले व तिच्याशी लैंगिक संबध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीत २० मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी शनिवारी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. युवतीला पळून अमरावतीतून नेले, तर घटना बीड जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनिकेत बाबासाहेब जाधव (२८), एक महिला (रा. जवळाला, ता. पाटोद, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (एन), २४२, १०९ अन्वये गुन्हा नोंदविला. युवतीशी प्रेम झाल्यानंतर आरोपीने तिला पळवून नेऊन तिच्याशी हनुमान मंदिरात लग्न केले. महिलेने आरोपी व युवतीला एका रूममध्ये कोंडून बाहेरून साखळी लावली. त्यानंतर आरोपीने युवतीवर बलात्कार केला. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. तपास एपीआय पूजा खांडेकर करीत आहेत.