राज्य शासनाच्या तोतया खासगी सचिवाला सोडले मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:05+5:302021-07-17T04:11:05+5:30
पथ्रोट-वनोजा बाग : राज्य शासनाकडून नियुक्त खासगी सचिव असल्याचे सांगून सरकारी स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करणाऱ्या युवकाला दुकानदार व ...
पथ्रोट-वनोजा बाग : राज्य शासनाकडून नियुक्त खासगी सचिव असल्याचे सांगून सरकारी स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करणाऱ्या युवकाला दुकानदार व नागरिकांनी पकडून तहसीलदारांच्या पुढ्यात नेले. मात्र, पोलीस ठाण्यात जुजबी चौकशी करून त्याला सोडण्यात आले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात गुरुवारी घडलेल्या या प्रकरणाची तालुक्यात चर्चा आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, अंजनगाव तालुक्यातील मलकापूर येथे सरकारी धान्य विक्री केंद्रावर तोतया महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला खासगी सचिव असल्याचे दर्शवून तोतयाने प्रवेश केला. तुमच्याबाबत तक्रार प्राप्त झाल्या आहेत. यामुळे तुमच्या रेकॉर्डची पाहणी करायची आहे, असे त्याने सांगितले. मात्र, त्याच्या हालचाली व ओळखपत्र संशयास्पद असल्याने दुकानदार व उपस्थित ग्रामस्थांनी त्याला तहसीलदार अभिजित जगताप यांच्या दालनात उपस्थित केले. तो तोतया असल्याचे सिद्ध झाले. तहसीलदारांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे सांगितल्याने लोकांनी पोलीस ठाणे गाठले. तेथे विचारपूस केल्यानंतर त्याला सोडण्यात आले. भामट्याचे नाव पाखरे असल्याचे व तो दर्यापूर तालुक्यात राहणारा असल्याची माहिती याप्रकरणी पुढे आली आहे.
---------------
तहसीलदारांचा कोट येत आहे.