जत्रा डोहात बुडून अकोला जिल्ह्यातील पर्यटकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:34+5:302021-07-24T04:10:34+5:30
चिखलदरा : पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध जत्राडोहात बुडून अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील एका पर्यटक युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी ...
चिखलदरा : पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध जत्राडोहात बुडून अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील एका पर्यटक युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांचे मृतदेहाचे काढण्याचे कार्य सुरू होते.
समीर बेग शकिर बेग (२२, रा. हिवरखेड ता. तेल्हारा जिल्हा अकोला) असे मृताचे नाव आहे. आपल्या काही मित्रांसह चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आला होता. शुक्रवारी सायंकाळी पोहण्याच्या नादात त्याने जत्राडोहच्या डोहात उडी मारली. मात्र, बाहेर न आल्याने मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला,आरडा ओरडा केली. मात्र, डोहात बुडाला घेणे त्याचा शोध लागला नाही. चिखलदारा पोलीस त्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, शोधकार्य सुरू असल्याचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी सांगितले.
बॉक्स
सुरक्षा वाऱ्यावर महिन्याभरात तिघांचा मृत्यू
चिखलदरा पर्यटन स्थळावरील कलालकुंडमध्ये रिद्धपूर, चिचाटी येथे अमरावती येथून एका कोचिंग क्लासने सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा, तर शुक्रवारी अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी नागपूर येथील पर्यटकांचा स्वतः फोटो काढण्याच्या नादात मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटन स्थळावरील सुरक्षा वाऱ्यावर सुटली आहे. वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत यांची सुरक्षा आहे, हे विशेष.