पोहरा-चिरोडीत जंगल सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:41 PM2017-11-13T22:41:49+5:302017-11-13T22:42:04+5:30

पोहरा-चिरोडी जंगल सफारी व निर्वचन या उपक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला. जंगल सफारीचा अनुभव घेणाºया अमरावतीकर पर्यटकांना ही जंगलातील रपेट खूपच भावली.

Tourists respond to Pohra-Chirodit Jungle Safari | पोहरा-चिरोडीत जंगल सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद

पोहरा-चिरोडीत जंगल सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद

Next
ठळक मुद्देपोहरा वन विश्रामगृहापासून प्रारंभ : वन्यजिवांचे झाले दर्शन, वृक्षवल्लींशी जुळली मने

अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : पोहरा-चिरोडी जंगल सफारी व निर्वचन या उपक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला. जंगल सफारीचा अनुभव घेणाºया अमरावतीकर पर्यटकांना ही जंगलातील रपेट खूपच भावली.
अमरावतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोहरा-चिरोडी जंगल हे वन्यजिवांमुळे नावारूपास आले आहे. वाघ, बिबट, निलगाय, चित्तळ, हरिण, काळवीट, सांबर, मोर, सायल, देवगाई, डुक्कर, विविध पक्षी, फुलपाखरे आणि वृक्षांच्या विविध प्रजातींची येथे रेलचेल आहे. वनवैविध्यामुळे या जंगलाकडे शहरी पर्यटकांचा लोंढा वाढला असून, वनविभागाने मेळघाटप्रमाणे येथे जंगल सफारी योजना आणली आहे. यामुळे स्थानिक गावकºयांना रोजगाराची संधी मिळाली आहे. अमरावती वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती (पोहरा) यांच्या प्रयत्नांतून व अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला. सोमवारी पहाटे सफारीस पोहरा वन विश्रामगृहापासून प्रारंभ करण्यात आला.
उपवनसंरक्षक हेमंत मिणा, समितीचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. पडगव्हाणकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) योगिता मगर, वनपाल विनोद कोहळे, एम. के. निर्मळ तसेच पोहरा व चिरोडीचे वनकर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Tourists respond to Pohra-Chirodit Jungle Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.