खेळण्यातील पिस्टल रोखणे युवकाच्या अंगलट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:40+5:302020-12-22T04:13:40+5:30

फोटो पी २१ चांदूररेल्वे फोल्डर चांदूर रेल्वे : कारचालक युवकाने दुचाकी स्वराला कट मारला. त्यावरून त्या दोघांत बाचाबाची झाली ...

Toy Pistol Prevention Youth's Wrist! | खेळण्यातील पिस्टल रोखणे युवकाच्या अंगलट!

खेळण्यातील पिस्टल रोखणे युवकाच्या अंगलट!

Next

फोटो पी २१ चांदूररेल्वे फोल्डर

चांदूर रेल्वे : कारचालक युवकाने दुचाकी स्वराला कट मारला. त्यावरून त्या दोघांत बाचाबाची झाली आणि त्या युवकाने चक्क दुचाकीस्वारावर पिस्टलच रोखले. घाबरलेल्या अवस्थेत दुचाकीस्वार पळाला. पण समोरच उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांचे वाहन असल्याने तो युवक चांगलाच अडचणीत आला. त्याच्याजवळ सापडलेले पिस्टल, पैसे आणि सोने हे सारेच खोटे निघाले.

शहराच्या बाहेरून जात असलेल्या अमरावती वर्धा बायपासवर रेल्वे गेटजवळ रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी चांदूर रेल्वे पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पिस्टल असल्याने प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्या युवकाला कारमधून बाहेर काढून झडती घेतली असता, त्याच्याजवळ १ लाख रुपये रोख आणि किलोभर सोनेही आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सुवर्णकाराला तेथे बोलावले. तपासाअंती ते पिस्टल सिगारेट पेटवायचे लायटर होते, पैसे हे खेळण्यातील मनोरंजन बँकेचे आणि सोनेही नकली आढळून आले.

हा सर्व प्रकार पाहून पोलीसही अवाक झाले. तो युवक अमरावतीहून वर्धेला चारचाकी वाहनाने जात होता. विशेष म्हणजे तो युवक विद्यार्थी असून त्याच्याजवळ त्याच्या नावाच्या १० ते १२ पदव्याही दिसून आल्या. गावातील लहान मुलांना खेळण्यासाठी ते पैसे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. नकली सोने घालायचा आपला छंद असल्याचे तो म्हणाला. पुरेशा चौकशीनंतर पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. मात्र शहरात या घटनेची चर्चा दिसून आली.

कोट

सदर घटनेची माहिती मिळताच आम्ही त्या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात तो यूपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्याचे समजले. त्यामुळे समज देऊन त्याला सोडून देण्यात आले.

- मगन मेहते, ठाणेदार चांदूर रेल्वे

--------------

Web Title: Toy Pistol Prevention Youth's Wrist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.