रस्ता काँक्रीटीकरणात दाबला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:41+5:302021-01-09T04:10:41+5:30

फोटो पी ०८ धारणी फोल्डर पंकज लायदे धारणी : शहरातील सर्व्हे क्रमांक १२६ वर नगरपंचायत प्रशासनाद्वारे बाजार ...

Tractor pressed in road concreting | रस्ता काँक्रीटीकरणात दाबला ट्रॅक्टर

रस्ता काँक्रीटीकरणात दाबला ट्रॅक्टर

Next

फोटो पी ०८ धारणी फोल्डर

पंकज लायदे

धारणी : शहरातील सर्व्हे क्रमांक १२६ वर नगरपंचायत प्रशासनाद्वारे बाजार ओटे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामात कंत्राटदाराने भर रस्त्यात उभा असलेल्या ट्रॅक्टरभोवती काँक्रीटीकरण केले. या रस्ता बांधकामाच्या काँक्रीटीकरणात ट्रॅक्टरचा मुंडा सुमारे एक फुट दबला. या अफलातून प्रकाराने धारणी नगरपंचायत, संबंधित कंत्राटदार व तो ट्रॅक्टरमालकही चर्चेत आले आहेत.

गुजरी बाजारातील ओटे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. अतिक्रमणाचे अडथळे दूर सारून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्यादरम्यान डॉ. रमीज यांच्या मालकीचा ट्रॅक्टर उभा होता. संबंधित कंत्राटदाराने ट्रॅक्टर हटविण्यास सुचविले असता, तो हटविण्यात आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर न हटविता तेथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ट्रॅक्टरमालकाने त्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, नगरपंचायत काय करू शकते, मेळघाटात काहीही घडू शकते, याचा प्रत्यय या घटनेने दिला आहे.

कोट

रस्त्याचे बांधकाम सुरू असताना वारंवार सूचना दिली. ट्रॅॅक्टर न हटविता उलट संबंधिताने आधी रस्त्याचे बांधकाम करा, नंतरच आम्ही ट्रॅक्टर हटवू, असे सांगितले. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला कळविले आहे.

मो. शौकत मो. शकूर

कंत्राटदार, धारणी

कोट

सदर ट्रॅक्टर आम्हाला त्या जागेवरून हटवायचा नसल्याने कंत्राटदाराला बांधकाम करण्याचे आम्हीच सांगितले. त्यावरून ते बांधकाम केले. आता आम्ही ट्रॅक्टर हटवून राहिलेले बांधकाम करू देणार आहोत.

डॉ. रमीज

ट्रॅक्टरमालक, धारणी

Web Title: Tractor pressed in road concreting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.