प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:34 AM2017-12-05T00:34:26+5:302017-12-05T00:34:45+5:30

प्रशांतनगर येथील बगिच्यामध्ये ट्रॅफिक पार्क निर्माण करता येईल का, या विषयावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

Traffic Park in Pantantnagar Garden | प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क

प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क

googlenewsNext
ठळक मुद्देबैठक : ३.५० कोटींच्या डीपीआरवर मंथन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रशांतनगर येथील बगिच्यामध्ये ट्रॅफिक पार्क निर्माण करता येईल का, या विषयावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यात मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, नगरसेवक प्रदीप हिवसे, नूतन भुजाडे, राधा कुरील जयश्री डहाके, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहा. आयुक्त सुनील पकडे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अभियंता सुहास चव्हाण, विजय राऊत, सल्लागार उन्नत भारत अभियान अर्चना बारब्दे, विद्युत इंगोले, श्रीकांत गिरी, गार्गी खडसे उपस्थित होते.
शहरातील महत्त्वाच्या उद्यानापैकी एक असलेल्या प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क तसेच इतरही काही गोष्टी करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी राही रिलेटर्स प्रा. लि.चे विजय राऊत यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी प्रशांतनगर येथील बगिच्यासाठी एक प्रस्ताव तयार केला. त्याचे शनिवारी प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवकांनी काही बदल सुचवून पुन्हा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून सर्व संमतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. याठिकाणी ट्रॅफिक पार्क तयार करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम सर्वांना कळावेत, यासाठी ट्रॅफिक पार्क तयार करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील नागरिक त्याला भेट देतील, असे ट्रॅफिक पार्क येथे निर्माण होणार आहे. याठिकाणी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था राहील. सद्यस्थितीत कोणताही बदल न करता नव्याने काही गोष्टी या बगिच्यात करण्यात येतील. येथे फूड झोन तयार करणार आहे. या पार्कमध्ये इनडोअर व आऊटडोअर गेम्स तसेच किड्स गेम झोन निर्माण केल्या जाणार आहे. सोलर पॉवर प्लांटसुद्धा तयार केल्या जाऊ शकणार आहे. आॅडिटोरियम हॉलसुद्धा प्रस्तावित केला आहे. योगासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविल्यास स्थानिकांना फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे. हा प्रकल्प सविस्तर तयार करण्याची सूचना संबंधितांना दिली आहे.

Web Title: Traffic Park in Pantantnagar Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.