ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:06 AM2017-10-22T01:06:31+5:302017-10-22T01:06:42+5:30

दिवाळीनिमित्त गावाकडे परत येणाºयांना पुणे व इतर बड्या शहरांमध्ये नोकरीेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन-चारपटीने प्रवासभाडे मोजावे लागत आहे.

Traffic of passengers in the booty | ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची लूट

ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची लूट

Next
ठळक मुद्देस्लॅक सीझनवर उतारा : प्रवास भाडे तिप्पट-चौपटीने वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळीनिमित्त गावाकडे परत येणाºयांना पुणे व इतर बड्या शहरांमध्ये नोकरीेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन-चारपटीने प्रवासभाडे मोजावे लागत आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्या प्रवाशांच्या लुटीत एकदिलाने सामील झाले आहेत.
एसटी कर्मचाºयांचा संप शुक्रवारी मध्यरात्री जरी संपला असला तरी खासगी एसी, नॉन एसी लक्झरी बसचे भाडे कमी झालेले नाहीत. सदर प्रतिनिधीने शहरातील काही लक्झरी बस बुकिंग कार्यालयाला भेट दिली तेव्हा हे वास्तव पुढे आले. एरवी दिवाळीपूर्वी ६०० ते १००० रुपयांपर्यंत शनिवारी रात्री व रविवारकरिता एसी स्लीपरचे तिकीट २००० ते ४००० रुपयांच्या घरात होते. सर्व लक्झरी बसेस पुढील काही दिवस हाऊसफुल्ल असल्याने ग्राहकांना तिकीट आरक्षित करायचे असेल, तर चारपट पैसे जादा मोजावे लागले आहेत. यातून लाखोंची कमाई खासगी वाहतूकदार करीत आहेत. सामान्य नागरिकांना मात्र प्रवास आवाक्याबाहेरचा ठरत आहे. अमरावतीच्या वेलकम पॉइंटवरून दररोज सुमारे शंभर बस पुण्याला जातात. काही बसेस नागपूरवरून येतात. भाडेवाढीमुळे त्यांची दैनंदिन कमाई कोटीच्या घरात आहे.
पुण्याप्रमाणेच औरंगाबादलाही शहरातील बरेच युवक कामाला आहेत. काही नामांकित खासगी कंपन्याच्या एसी बसचे औरंगाबादचे तिकीट हे शनिवारी चार हजारांपर्यंत होते. दिवाळीपूर्वी हा दर हजार ते बाराशे रुपये होता.
तिकीट दरवाढ ३० आॅक्टोबरपर्यंत
अमरावती : इर्विन चौकातील काही ट्रॅव्हल्स एजन्सींनी ३० आॅक्टोबरपर्यंत तिकीट दर चढे राहणार असल्याचे सांगितले. आॅनलाइन बूकिंगमुळे प्रवासी कमी असले तरी नियोजित बसफेरी रद्द करता येत नाही. त्यावेळी होणारे नुकसान भरून काढण्याची संधी दिवाळीच्या सुट्यांमध्ये केलेल्या दरवाढीवरून मिळते, असे समर्थन काही ट्रॅव्हल्स एजंटकडून करण्यात आले. यासंदर्भात आरटीओ अधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.

खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीचा विषय त्यांच्यापुरता मर्यादित आहे. पोलीस प्रशासन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
- शशिकांत सातव, पोलिस उपायुक्त

Web Title: Traffic of passengers in the booty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.