वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

By admin | Published: April 25, 2016 12:03 AM2016-04-25T00:03:46+5:302016-04-25T00:03:46+5:30

शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली.

Traffic Police Recovering Revenue! | वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

Next

परतवाड्यात बैठक गाजली : गतिरोधक, जयस्तंभ चौकातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर
परतवाडा : शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली. शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण, अवैध वाहतूक जडवाहतुकीला प्रवेश बंद, जयस्तंभ हटविण्यासह, गतिरोधक व तैनात वाहतूक पोलीस कर्मचारी आपले ठिकाण सोडून दिवसभर वसुलीत मग्न राहात असल्याचा मुद्दा गाजला.
बैठकीत अचलपुरचे उप-विभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर, ठाणेदार किरण वानखडे, अचलपुरचे नरेंद्र ठाकरे, सरमसपुऱ्याचे ठाणेदार मुकेश गावंडे, परिवहन विभागाचे महल्लेंसह नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींमध्ये नगरसेवक बाळासाहेब वानखडे, रूपेश ढेपे, राजेंद्र लोटिया, सुरेश अटलानी, गजानन कोल्हे, प्रवीण तोंडगावकर, मनीष विधळे, नीलेश सातपुते, किशोर कासार, ओमप्रकाश दीक्षित, दिनेश ठाकरे, कौतीककर यांच्यासह मालवाहू ट्रॅव्हल्सचे मालक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परतवाडा शहरात मागील पंधरा दिवसांत जयस्तंभ ते बसस्थानक या अमरावती महामार्गावर ट्रक अपघातात चार निष्पापांचे बळी गेले. यानंतर जनप्रक्षोभ उफाळला. मग कुठे पोलीस यंत्रणेला जाग आली. अलिकडे नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडी जाग आली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक शहरातील सर्वसामान्यांच्या जिवावर बेतत असताना उपरोक्त तिन्ही विभागांचा समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शनिवारी वाहतूक समस्येवर नागरिकांची मते विचारण्या इतपत नामुष्की ओढविल्याचे विदारक चित्र आहे. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी पार पाडली असती तर अपघातात झालेली प्राणहानी टाळता आली असती, असे मत अनेकांनी बैठकीत व्यक्त केले.

जयस्तंभ, गतिरोधक, अवैध वाहतूक
वाढती लोकसंख्या व मध्यप्रदेशच्या आंतरराज्यीय सिमारेषांसह पाच तालुक्यांच्या सिमारेषांवर असलेल्या परतवाडा शहरात जडवाहतूक वाढली आहे. ४० पेक्षा अधिक खेड्यातून येथे अवैध प्रवासी वाहतूक चालते. नागरिकांचे लोंढे परतवाडा शहरात दिवसभर कामानिमित्त येत असतात. शहरातील प्रमुख मार्गांवर गतिरोधक नाही. जयस्तंभचे स्थानांतरण आणि चौपदीकरण झाल्यानंतर सुध्दास गतिरोधक दिलेला नाही. त्यामुले अवैध वाहतूक करणारी वाहने शहरातून भरधाव धावत असतात.

पार्किंग झोन, बायपास अन् ओव्हरलोड
परतवाडा शहरात ठिकठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची परवानगी नगरपालिकेने दिली. मात्र, तेथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात. मुख्य रस्त्यांवर वाहने उभी ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जड वाहतुकीसाठी रिंग रोडचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे. हे कार्य वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. आरटीओ विभागाकडून ‘ओव्हर लोड’ ट्रक कसे सोडले जातात, हा मुद्दा देखील बैठकीत गाजला.

Web Title: Traffic Police Recovering Revenue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.