मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका
By गणेश वासनिक | Published: August 20, 2023 03:43 PM2023-08-20T15:43:37+5:302023-08-20T15:43:52+5:30
अप-डाऊनच्या प्रवाशांची होणार दमछाक, अमरावती-मुंबई, अमरावती-पुणे गाडी दोन दिवस रद्द
अमरावती: भुसावळ विभागात ३० ऑगस्ट राेजी सायंकाळी ६ वाजता पासून तर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुर्तिजापूर स्टेशन यार्ड येथे डाउन लांब पल्ल्याच्या लूप लाईनच्याच्या तरतुदीसाठी रेल्वे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक परिचालीत करणार आहे. त्यामुळे यादरम्यान मूर्तिजापृूर येथून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसणार असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या मार्गावर दोन मालगाड्या एकत्र जोडून एकाच वेळी धावत आहेत. पहिल्या मालगाडीसोबत जोडलेली असल्यामुळे दुसऱ्या मालगाडीचा धावण्याचा वेळ आणि धावण्याचा मार्ग वाचतो. दोन मालगाड्यांच्या जवळपास १०० चॅगन एकत्र धावतात. अशा प्रकारे एक मालगाडीच्या एकाच वेळी आणि एकाच मार्गावर दोन मालगाड्या चालवणे शक्य आहे. ज्यामुळे दुसऱ्या ट्रेनच्या वेळेची आणि मार्गाची बचत होते.
भुसावळ आणि नागपूर विभागात अशा लांब पल्ल्याच्या मालगाड्या (दोन मालगाड्यांचे संयोजन) भुसावळ ते नागपूर विभागादरम्यान नियमितपणे धावतात. त्यामुळे मूर्तिजापूर स्थानकावर जवळपास १०० मालगाड्या सामावून घेण्याएवढी लांब लूप लाईन बांधण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याच्या मालगाड्यांपेक्षा मेल, एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देता येईल. लांब पल्ल्याच्या मालगाड्या यशस्वीरीत्या चालवण्याबरोबरच मेल एक्सप्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा वाचवण्यात मदत होणारआहे. त्यासाठी मूर्तिजापूर स्थानकावर लांब पल्ल्याच्या वळणासाठी बांधकाम ब्लॉक करण्याचे ३० व ३१ ऑगस्ट रोजी नियोजन केले आहे.
या मेल/एक्स्प्रेस १४ गाड्या होणार रद्द
काचीगुडा-नरखेड एक्सप्रेस (१७६४१) ३० ऑगस्ट,
नरखेड-काचेगुडा एक्सप्रेस (१७६४२)३१ ऑगस्ट
लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह विशेष (०११२७) २९ ऑगस्ट
बल्हारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०११२८) ३० ऑगस्ट
भुसावळ- वर्धा एक्सप्रेस (१११२१) ३० ऑगस्ट
वर्धा-भुसावळ एक्सप्रेस (१११२२) ३१ ऑगस्ट
पुणे-अमरावती एक्सप्रेस (२२११७) ३० ऑगस्ट
अमरावती-पुणे एक्सप्रेस (२२११८) ३१ ऑगस्ट
भुसावळ-बडनेरा पॅसेंजर विशेष (०१३६५) ३१ ऑगस्ट
बडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष (०१३६६) ३१ ऑगस्ट
मुंबई-अमरावती एक्सप्रेस (१२१११) ३० ऑगस्ट
अमरावती-मुंबई एक्सप्रेस (१२११२) ३० ऑगस्ट
नागपूर-पुणे एक्सप्रेस (१२१३६) ३० ऑगस्ट
पुणे- नागपूर एक्सप्रेस (१२१३५) ३१ ऑगस्ट