एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

By Admin | Published: February 27, 2016 12:11 AM2016-02-27T00:11:09+5:302016-02-27T00:11:09+5:30

शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे,

Traffic-related lessons from ACP | एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

googlenewsNext

कर्मचाऱ्यांची उपस्थिती : अपघात टाळण्याचा मंत्र
अमरावती : शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे, अशा शब्दांत वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपघातमुक्तीचे धडे दिले.
शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ या तीन भागांमध्ये वाहतूक शाखेची विभागणी करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेली वाहन संख्या पाहता वाहतूक शाखेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्या पार्श्वभूमिवर डाखोरे यांनी अपघात झाल्यावर वाहतूक पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरित लगतच्या रुग्णालयात हलवावे व वाहनांना त्वरित रस्त्याने बाजूने करावे, गर्दी होऊन जनआंदोलन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि तत्पूर्वी अपघातच होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्धोक वाहतुकीसाठी जनजागृती करण्याचे धडे डाखोरे यांनी दिले. शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक स्थित कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्राला वाहतूक निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic-related lessons from ACP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.