‘कमळ’च्या वाहनातून सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:45 AM2018-11-23T00:45:10+5:302018-11-23T00:45:52+5:30

पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

Traffic smugglers from 'Kamal' vehicle | ‘कमळ’च्या वाहनातून सागवान तस्करी

‘कमळ’च्या वाहनातून सागवान तस्करी

Next
ठळक मुद्देवाहनक्रमांक बनावट : मूळ क्रमांकाची चारचाकी बैतुलात

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या वाहनाचा वापर गोमांस तस्करीतही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिनेस्टाईल पाठलाग करून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी अचलपूर शहरातील देवडी परिसरात एमपी ४८ सी २९७१ क्रमांकाचे वाहन सागवान चरपटांसह पकडले. या वाहनावर मागील बाजूस भाजपचे ‘कमळ’ अंकित आहे. पंचनाम्यादरम्यान हे वाहन सागवान तस्करीसह गोमांस तस्करीतही वापरले गेल्याचे वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पकडलेल्या वाहनाची माहिती बैतूल आरटीओकडून घेण्यात आली. बैतूल येथील रामबाबू मंडल यांच्या नावे हे वाहन निघाले. रामबाबू मंडल (रा. बैतूल) यांना वनअधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तेव्हा त्यांची एमपी ४८ सी २९७१ क्रमांकाची चारचाकी त्यांच्या घरीच उभी होती. त्यांनी व्हिडीओ कॉलिंगवरून घरासमोर उभी असलेले वाहन वनअधिकाऱ्यांना दाखविले.
स्टॅम्प पेपरचा आधार
परतवाडा : चेसीस क्रमांक एमए१वायए२जेएचकेडी२डी४२४९६ हा वनअधिकाºयांनी अमरावती आरटीओकडे पाठवला. यावरून गाडीचा खरा नंबर एमएच २७ अ‍ेआर ६२२३ आणि मालक अभिजित पवार (रा. अमरावती) असल्याची माहिती पुढे आली. प्राप्त माहितीवरून वाहनाचे नंबर बदलवून वनतस्करी होत असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
यात वन अधिकाऱ्यांनी अभिजित पवार यांना नोटीस बजावली. ब्राम्हणवाडा थडी येथील अरशोद्दीन हसनोद्दीन इनामदार यांना २०१६ मध्येच वाहन विकले. जप्त केलेले वाहन माझीच आहे किंवा नाही, हे मला सांगता येणार नाही, असे विक्रीचा स्टॅम्प पेपर समोर करीत अभिजित पवार यांनी वनअधिकाऱ्यांपुढे त्यांनी स्पष्ट केले.
स्टॅम्प पेपरवरून वनअधिकाऱ्यांनी अरशोद्दीनला नोटीस बजावली आहे. पण, अजूनपर्यंत अरशोद्दीन वनअधिकाऱ्यांपुढे हजर झालेला नाही. वनअधिकारी अरशोद्दीनच्या प्रतीक्षेत आहेत.
वनविभाग या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आणखी कोणती नाट्यमय घडामोड पुढे येईल, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
चालक अटकेत, मालक फरार
क्रमांक बदलवून वाहनातून सागवान तस्करीप्रकरणी चालकास वनअधिकाऱ्यांनी अटक केली. पण, वाहनमालक अद्यापही मोकाट आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चार्जशिट दाखल करून प्रकरण न्यायालयापुढे ठेवण्यात आलेले नाही. पकडलेले वाहन सरकार जमाही झालेले नाही.
गोमांस तस्करी
वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या वाहनाच्या मागील बाजूस ‘कमळ’ आहे. त्यावर ‘भाजप’ असे लिहिले आहे. गोमांसाच्या वाहतुकीकरिता या वाहनाचा २०१६ पासून अनेकदा वापर झाल्याची शंका वनअधिकाऱ्यांना आहे. अवैध सागवानसह वाहन जप्त केल्यानंतर जनावरांच्या मांसाची दुर्गंधी येत होती. कित्येक दिवस ही दुर्गंधी कायम होती. हे वाहन अवैध सागवान चरपटांसह वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या निवासस्थानासमोरील आवारात उभे आहे.

Web Title: Traffic smugglers from 'Kamal' vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.